Shocking Incident | दारूच्या नशेत त्याने ११,००० व्होल्टच्या हायटेन्शन वायरलाच बनवले अंथरूण ! 
विश्वसंचार

Shocking Incident | दारूच्या नशेत त्याने ११,००० व्होल्टच्या हायटेन्शन वायरलाच बनवले अंथरूण !

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्‍ली : सोशल मीडियावर रोजच अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात; पण काही व्हिडीओ इतके भयानक असतात की ते पाहून अंगावर काटा येतो. सध्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून एक असाच थरारक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून इंटरनेटवरील नेटिझन्सचे डोके चक्रावून गेले आहे. येथे एका मद्यधुंद व्यक्तीने थेट ११,००० व्होल्टच्या हायटेन्शन वीज वाहिनीवर जाऊन झोपण्याची जीवघेणी स्टंटबाजी केली.

विजेच्या तारांवर मारली डुलकी

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसते की, हा व्यक्ती नशेत धुंद होऊन वीज कंपनीच्या खांबावर चढला आणि थेट हायटेन्शन तारांपर्यंत पोहोचला. एवढेच नव्हे, तर तो दोन तारांच्या मध्ये अशा प्रकारे आरामात झोपला, जणूकाही तो आपल्या घरातील पलंगावर किंवा एखाद्या उद्यानात विश्रांती घेत आहे. त्याचा एक पाय खाली लटकत होता, तर हातांच्या साहाय्याने त्याने स्वतःचा तोल सांभाळला होता. तो अत्यंत बेफिकीरपणे कधी तारांवर झुला झुलल्यासारखा तर कधी ताजी हवा खाल्ल्यासारखा वागत होता. हे दृश्य पाहून खाली गोळा झालेल्या स्थानिक लोकांचा मात्र थरकाप उडाला होता.

स्थानिकांनी दिलेल्‍या माहितीनुसार, ही व्यक्ती अतिप्रमाणात दारू प्यायली होती आणि ‘ताजी हवा’ खाण्याच्या नादात खांबावर चढली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वीज विभागाच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्यानंतर वीज कर्मचारी आणि स्थानिक लोकांनी खूप समजूत काढल्यानंतर या व्यक्तीला सुरक्षित खाली उतरवण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT