Drumstick Health benefits | शेवग्यामध्ये दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम Pudhari File Photo
विश्वसंचार

Drumstick Health benefits | शेवग्यामध्ये दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : ऑस्टियोपेनिया, ऑस्टियोपोरोसिस आणि रिकेटस्सारख्या आजारांमुळे रुग्णांचे जीवन खूप त्रासदायक होते. या सर्व आजारांपासून वाचण्यासाठी शरीरातील कॅल्शियमची पातळी कमी होऊ नये. अनेक लोक दुधाला कॅल्शियमचा मुख्य स्रोत मानतात; पण काही लोक दुधाचे सेवन करू शकत नाहीत. कारण, काहींना त्याची चव आवडत नाही, तर काहींना अ‍ॅलर्जी होते. अशा परिस्थितीत, दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न करणार्‍या लोकांसाठी शेवगा हा ‘सुपरफूड’ एक उत्तम पर्याय ठरू शकतो, असे आहार तज्ज्ञांनी म्हटले आहे.

आपल्या शरीरातील प्रत्येक भागाला कॅल्शियमची गरज असते; पण हाडांसाठी ते सर्वात महत्त्वाचे असते. जेव्हा आहारातून पुरेसे कॅल्शियम मिळत नाही, तेव्हा शरीर हाडांमधून कॅल्शियम शोषू लागते. त्यामुळे, मजबूत हाडांसाठी आहारात एका विशिष्ट गोष्टीचा समावेश करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनुसार, शेवग्यामध्ये दुधापेक्षा 17 पट जास्त कॅल्शियम आढळते.

शेवग्याच्या पानांमध्ये दुधाच्या तुलनेत 4 पट जास्त कॅल्शियम असते, तर त्याच्या पावडरमध्ये ते 17 पट जास्त असते. याला ‘अँटी-एजिंग’ मानले जाते. त्यामुळे वयाच्या 30 वर्षांनंतर या सुपरफूडचा आहारात समावेश करायला हवा. यामुळे बोन मास वाढतो आणि हाडांची जाडी सुधारते. शेवग्याची पाने आणि पावडर आहारात समाविष्ट करणे खूप सोपे आहे. जे लोक दुग्धजन्य पदार्थ खाऊ शकत नाहीत किंवा ज्यांना लॅक्टोज अ‍ॅलर्जी आहे, ते शेवग्याचा पराठा बनवून खाऊ शकतात.

पोषणतज्ज्ञांनुसार, याचा रायता बनवूनही खाऊ शकता. तसेच, सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात शेवगा पावडर मिसळून पिऊ शकता. शेवगा गर्भवती महिला आणि मुलांसाठीही खूप फायदेशीर आहे. यामध्ये लोह (आयर्न) भरपूर प्रमाणात आढळते, जे या लोकांसाठी खूप आवश्यक आहे. हे लोहाची कमतरता दूर करते आणि अ‍ॅनिमियापासून संरक्षण करते. शरीर योग्यरीत्या कार्य करण्यासाठी रक्ताची खूप गरज असते आणि शेवगा हे सुनिश्चित करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT