विश्वसंचार

चहा कमी पिणे ठरू शकते हानीकारक

Pudhari News

लंडन : चहा पिणार्‍यांसाठी एक चांगली बातमी आहे. 'युरोपिय जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह कार्डियोलॉजी'च्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या  नव्या संशोधनातील माहितीनुसार किमान दोन दिवसांतून एक कप तरी चहा पिलाच पाहिजे. कारण, हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असते. 

सुमारे एक लाखांहून अधिक चिनी लोकांवर हे संशोधन करण्यात आले आहे. हे सर्वजण दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आरोग्यासंबंधीच्या संशोधनाचे एक भाग होते. या लोकांच्या आरोग्य आणि व्यवहारासंबंधीच्या माहितीवरून चहासंबंधीचा वरील निष्कर्ष काढण्यात आला आहे. 

संशोधनातील निष्कर्षानुसार  जे लोक एका आठवडाभरात तीन कपपेक्षा कमी चहा पितात त्यांना हृदयासंबंधीच्या आजारांचा धोका जास्त असू शकतो. तसेच, जे लोक आठवड्यात तीन कपपेक्षा जास्त चहा पितात, त्यांना हृदयासंबंधीच्या आजारांचा धोका 20 टक्यांपेक्षा कमी असू शकतो. उल्लेखनीय म्हणजे जे लोक आठवड्यातून तीनहून अधिक कप चहा पितात, त्यांना  हृदयासंबंधीच्या आजारांमुळे मृत्यू येण्याचा धोकाही 22 टक्के कमी असतो. दरम्यान, ब्लॅक आणि ग्रीन टीमध्ये 'फ्लेवोनोईडस' नामक एक कंपाऊंड आढळते. यामुळे एक तर सूज कमी करण्यास मदत मिळते. याशिवाय ते हृदयासंबंधीचे आजार कमी करण्यास उपयुक्त ठरू शकते, असेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT