विश्वसंचार

जेव्हा मगर करते जीवघेणा हल्ला!

Arun Patil

कॅलिफोर्निया : मगर ही पाण्यातील सर्वात मोठी शिकारी. मगरीने पकडले, तर त्यापासून सुटका करून घेणे किती कष्टप्रद ठरू शकते, याचा प्रत्यय एका प्राणी संग्रहालयात आला. ट्रेनर या नात्याने कार्यरत असलेल्या एका महिलेसोबत हा भयंकर प्रकार घडला आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर बराच व्हायरल होत राहिला आहे.

या मगरीची पकड इतकी मजबूत होती की, त्या महिलेला स्वतःला सोडवणे कठीण झाले. याचवेळी आणखी एक रक्षक त्या महिलेच्या मदतीला आला आणि त्याने थेट त्या मगरीच्या पाठीवर बसत महिलेच्या सुटकेसाठी पूर्ण प्रयत्न केले. घटनेचे गांभीर्य पाहता आणखीही बरेच जण आले आणि कसेबसे त्या महिलेचा हात सुरक्षितरीत्या बाहेर काढला गेला.

आता जी व्यक्ती पाठीवर बसून होती, त्या व्यक्तीलाही बचावासाठी बरीच धडपड करावी लागली. हा व्हिडीओ पिक्चर फोल्डर्स या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. दोन मिनिटे 19 सेकंदांचा हा व्हिडीओ आतापर्यंत लाखाहून अधिक जणांनी पाहिला आहे.

SCROLL FOR NEXT