वैद्यकीय क्षेत्रासाठी वरदान ठरणार ड्रॅगन को-पायलट 
विश्वसंचार

वैद्यकीय क्षेत्रासाठी वरदान ठरणार ड्रॅगन को-पायलट

Dragon Co-Pilot : वैद्यकीय क्षेत्रातील ताण कमी होणार

पुढारी वृत्तसेवा

न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टने ड्रॅगन को-पायलट नावाचे एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट सादर केले असून, याची रचना खास वैद्यकीय क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. क्लिनिकल नोटस्चे ट्रान्सस्क्राईब, रेकॉर्डस तयार करणे आणि आणि वैद्यकीय माहिती सत्वर शोधण्यात याचा प्रामुख्याने उपयोग होणे अपेक्षित आहे. न्यूआन्स नामक एआय कंपनीच्या तंत्रज्ञानाची माहिती घेत या ड्रॅगन को-पायलटची रचना साकारण्यात आली आहे. मायक्रोसॉफ्टने 2021 मध्ये जवळपास 1.32 कोटी रुपये खर्चून याची खरेदी केली होती. आता मे 2025 पासून ही सुविधा अमेरिका व कॅनडा येथे उपलब्ध असणार आहे. त्यानंतर यूके, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड व अन्य देशात ते लाँच केले जाईल.

मायक्रोसॉफ्टने अमेरिकन मेडिकल असोसिएशन ( अचअ) च्या 2024 च्या आकड्यांचा संदर्भ देत सांगितले की, अमेरिकेत डॉक्टरांमध्ये बर्नआउट रेशिओ 48% पर्यंत पोहोचला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा रेशिओ कमी असला, तरी वाढलेला कार्यभार आणि रेकॉर्डस् ठेवण्याची जबाबदारी यामुळे डॉक्टरांवरील ताण कायम आहे.

या नव्या प्रणालीत ड्रॅगॉन मेडिकल वन, ड्रॅगन अ‍ॅम्बिएंट एक्सपेरियन्सचा प्रामुख्याने समावेश आहे. ड्रॅगन मेडिकल वन हे एआय व्हॉईस असिस्टंट प्रदान करते. याशिवाय, ड्रॅगन अ‍ॅम्बिएंट एक्सपेरियन्स टूल डॉक्टर आणि रुग्णांमधील संवाद ऐकून डेटा प्रोसेसिंग करून देण्यासाठी सक्षम आहे. डॉक्टर व रुग्णांमधील संवादाची नोंद ठेवणे, क्लिनिकल नोटस् तयार करणे, तसेच रेफरल लेटर आणि पोस्ट व्हिजिट रिपोर्ट तयार करणे, यात हा एआय असिस्टंट विशेष मदत करू शकतो, असेही मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT