विश्वसंचार

डॉल्फिन, ओर्कास आता कायमचे जलचरच!

Arun Patil

न्यूयॉर्क : एकेकाळी सस्तन प्राणी म्हणून वावरलेल्या आणि कालौघात जलचर झालेल्या काही प्राण्यांचा संशोधकांनी नव्याने अभ्यास केला आहे. त्यामध्ये डॉल्फिन, व्हेल तसेच ओर्कास म्हणजेच किलर व्हेलसारख्या जलचरांचा समावेश आहे. या प्राण्यांनी आता उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील एक विशिष्ट टप्पा ओलांडला आहे व त्यामुळे आता ते पुन्हा जमिनीवरील प्राणी म्हणून जगण्यासाठी मागे वळू शकत नाहीत असे दिसून आले आहे. ते आता पूर्णपणे जलचर प्राणीच बनले आहेत!

एका नव्या संशोधनात आढळले की हे प्राणी आता पुन्हा जमिनीवरील प्राणी म्हणून येण्याची शक्यता जवळजवळ मावळलेली आहे. त्यांनी पाण्यात वावरण्यासाठी ज्या क्षमता विकसित केल्या त्यांनी आता उत्क्रांतीची विशिष्ट सीमा ओलांडली आहे. त्यामुळे आता ते पुन्हा मागे परतू शकत नाहीत. 350 दशलक्ष ते 400 दशलक्ष वर्षांदरम्यानच्या काळात पहिले मासे पाण्याबाहेर रांगत आले.

अशा नव्या नवलाईच्या पृष्ठवंशीय प्राण्यांमध्ये पाय विकसित होऊ लागले होते. त्यानंतरच्या काळात चार पायांचे जीव विकसित झाले. अर्थात त्यासाठी अनेक पिढ्या जाव्या लागल्या. 'टेट्रापोडस्' हे चार पायांचे आणि वेगवेगळी बोटे असलेले पृष्ठवंशीय प्राणी आहेत. त्यामध्ये उभयचर, सरीसृप आणि सस्तन प्राण्यांचाही समावेश होतो. बहुतांश सस्तन प्राणी हे जमिनीवरच राहिले.

काहींनी 250 दशलक्ष वर्षांपूर्वी पुन्हा पाण्याकडे मोर्चा वळवला. पाण्यात राहण्यासाठीच्या काही क्षमता त्यांनी स्वतःमध्ये विकसित करून घेतल्या. ते क्वचितच जमिनीवर येऊ लागले आणि पाण्यातच वारंवार जाऊन राहू लागले. त्यामुळे असे जलचर बनलेले सस्तन प्राणी पुन्हा जमिनीवरील जीवन स्वीकारू शकतात का, याचे संशोधकांना कुतुहल होते व त्याद़ृष्टीने हे नवे संशोधन करण्यात आले. त्याची माहिती 'प्रोसिडिंग्ज ऑफ द रॉयल सोसायटी बी' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. संशोधकांनी सस्तन प्राण्यांच्या 5600 प्रजातींचा यासाठी अभ्यास केला. त्यांना आढळले की एकदा जमिनीवरून पाण्याकडे गेल्यावर पुन्हा माघारी फिरणे कठीण आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT