Shocking Surgery Case | पोटातून काढले 29 चमचे, 19 टूथब्रश Pudhari File Photo
विश्वसंचार

Shocking Surgery Case | पोटातून काढले 29 चमचे, 19 टूथब्रश

अरुण पाटील

लखनौ : काहीबाही खाणारे लोक जगभरात आढळतात. उत्तर प्रदेशच्या हापुडमधून अशीच एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. पोटात तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर एका तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याची तपासणी केली असता ते थक्क झाले. तरुणाच्या पोटातून एक-दोन नाही, तर तब्बल 29 स्टीलच्या चमचे आणि 19 टूथब्रश काढण्यात आले. हे ऐकून डॉक्टरांनाही धक्का बसला.

समोर आलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना हापुड येथील देव नंदिनी रुग्णालयाची आहे. बुलंदशहर येथील 35 वर्षीय सचिन हा व्यसनी होता, त्यामुळे त्याचे कुटुंबीय चिंतेत होते. कुटुंबीयांनी त्याला नशामुक्ती केंद्रात दाखल केले, परंतु सचिनला हे आवडले नाही. रागावलेल्या सचिनने नशामुक्ती केंद्रात असताना स्टीलच्या चमचे आणि टूथब्रश खाण्यास सुरुवात केली. सचिनने सांगितले की, त्याला नशामुक्ती केंद्रात कमी जेवणही मिळत होते, ज्यामुळे तो खूप त्रस्त होता. हळूहळू सचिनच्या पोटात तीव्र वेदना सुरू झाल्या आणि त्याची तब्येत बिघडत गेली.

जेव्हा वेदना असह्य झाल्या, तेव्हा त्याने डॉक्टरांना दाखवले. तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याच्या पोटात मोठ्या प्रमाणात धातूसारख्या वस्तू पाहिल्या, ज्यामुळे ते आश्चर्यचकित झाले. देव नंदिनी रुग्णालयाचे डॉक्टर श्याम कुमार यांनी सांगितले की, जेव्हा रुग्णाला आणले गेले, तेव्हा त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की तो नशामुक्ती केंद्रात चमचे आणि टूथब्रश खात असे. तपासणीनंतर तातडीने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टरांच्या एका टीमने यशस्वी शस्त्रक्रिया करून सचिनच्या पोटातून 29 स्टीलच्या चमचे आणि 19 टूथब्रश बाहेर काढले.

डॉ. श्याम कुमार यांनी असेही सांगितले की, अशा प्रकारची समस्या अनेकदा अशा लोकांमध्ये आढळते, ज्यांना मानसिक किंवा मनोवैज्ञानिक समस्या असतात. दरम्यान, ही घटना वैद्यकीय शास्त्रासाठीही एक मोठे आव्हान आहे. इतक्या मोठ्या संख्येने धातूच्या वस्तू आणि प्लास्टिक गिळल्यानंतरही रुग्णाचे जिवंत असणे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, योग्य वेळी शस्त्रक्रिया झाल्यामुळे तरुणाचा जीव वाचला. सध्या सचिनची प्रकृती स्थिर असून तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT