विश्वसंचार

दिशा पटानीचेही ‘वर्क फ्रॉम होम’! | पुढारी

Pudhari News

मुंबई : 'एम.एस. धोनी-अनटोल्ड स्टोरी', 'बागी-2', 'भारत', 'मलंग'सारख्या चित्रपटांमधून स्वतःचा चाहतावर्ग निर्माण केलेली दिशा पटानी सध्या काय करीत आहे असा तिच्या चाहत्यांना प्रश्‍न पडला होता. आता तिच्याबाबतची माहिती समोर आली आहे. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात दिशाही 'वर्क फ्रॉम होम' करीत आहे. ती घरात राहूनच ऑनलाईन पटकथा वाचन (स्क्रीप्ट नरेशन) करीत आहे.

बरेच दिवस घरातच राहून कंटाळलेल्या दिशाने आता कामाला सुरुवात केली आहे. अर्थात तिने यासाठी घर सोडलेले नाही! ऑनलाईन पटकथा वाचनाने तिचा वेळही बरा जात आहे आणि आगामी चित्रपटांचे कामही पुढे सरकत आहे. दिशा सध्या अनेक चित्रपटांच्या पटकथा वाचत आहे. त्यामुळे लवकरच ती एखादा चित्रपट स्वीकारेल असे म्हटले जात आहे. सध्याचा काळ डिजिटलचा असल्याने ती व्हर्च्युअल मीटिंग करून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांच्याशी संवाद साधत आहे. ती लवकरच सलमान खानबरोबर 'राधे' चित्रपटातही झळकणार आहे. तिच्याकडे सध्या मोहित सुरीचा 'एक व्हिलेन 2' हा चित्रपटही आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT