विश्वसंचार

‘बफेलो मोझेरोला’ स्वादिष्ट बनवणार्‍या जीवाणूंचा शोध

Arun Patil

न्यूयॉर्क : गरम गरम पिझ्झावरील 'बबलिंग ब्लॉब्स' असलेले 'बफेलो मोझेरोला'चीजची चव अनेकांना आवडत असते. या चीजला इतके स्वादिष्ट बनवतात काही विशिष्ट प्रकारचे जीवाणू. या क्रिमी, सफेद चीजला स्वाद आणणार्‍या अशा जीवाणूंची ओळख करण्यात आता संशोधकांना यश आले आहे.

इटलीच्या कॅम्पानिया प्रांतातील दोन डेअरींमधील बफेलो मोझेरेलाच्या नमुन्यांचा संशोधकांनी अभ्यास केला. इटलीच्या या भागातच काही म्हशींच्या दुधापासून हे चीज बनवले जाते. हे चीज बनवण्यामध्ये काही किरकोळ फरक असतात. मात्र, तरीही त्यांच्यामध्ये प्रामुख्याने दोन गटातील जीवाणूंचे प्राबल्य असते. एक गट आहे सर्पिलाकार, साखळीसारख्या जीवाणूंच्या कुळाचा. त्यांचे नाव 'स्ट्रेप्टोकोकस' असे आहे. दुसरा गट एखाद्या काठीसारख्या जीवाणूंच्या कुळाचा आहे. त्यांचे नाव आहे 'लॅक्टोबॅसिलस'.

या दोन्ही विस्तृत गटांमधील काही प्रजाती या प्रत्येक डेयरीच्या चीजमध्ये हटकून असतातच. याबाबतच्या संशोधनाची माहिती 'फ्रंटियर्स इन मायक्रोबायोलॉजी' या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुख्य संशोधक अ‍ॅलेसिया लेवंते यांनी सांगितले की इटालियन चीज बनण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचे योगदान देणार्‍या सूक्ष्म जीवांचा छडा या माध्यमातून लावण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT