विश्वसंचार

सैबेरियातील बैकाल सरोवरात चिखलाच्या ज्वालामुखींचा शोध

Arun Patil

मॉस्को : जगातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर असलेल्या रशियातील बैकाल सरोवराबाबत आता एक नवे संशोधन झाले आहे. एका स्वयंचलित अंडरवॉटर रोबोच्या सहाय्याने या सरोवराच्या खोल पाण्यात संशोधन करण्यात आले. त्यावेळी रोबोवर बसवण्यात आलेल्या व्हिडीओ कॅमेर्‍यांनी या सरोवरातील चिखलाच्या ज्वालामुखींचा शोध लावला.

या सरोवरातील मड व्होल्कॅनो म्हणजेच चिखलाच्या ज्वालामुखींची यापूर्वी माहिती नव्हती. आता या रोबोमुळे अशा ज्वालामुखींमुळे निर्माण झालेल्या भेगा व विशिष्ट रचनांचा शोध लागला आहे. सरोवरात दोन ठिकाणी असे चिखलाचे ज्वालामुखी दिसून आले आहेत. ते पाण्याच्या पृष्ठभागापासून 340 फूट ते 540 फूट खोलीवर आहेत. मलाया कोसा बे आणि गोरियाचिंस्काया बे अशा दोन ठिकाणी हे ज्वालामुखी आहेत. सरोवराच्या वायव्य काठाजवळ ही दोन्ही ठिकाणे आहेत. अर्थात संशोधकांना यापूर्वीच माहिती होते की, या विशाल सरोवरात चिखलाच्या ज्वालामुखींचे अस्तित्व आहे. अलीकडच्या काळातही अशा चिखलाच्या ज्वालामुखींचा उद्रेक झाला होता. असे ज्वालामुखी पाण्याच्या तळाशी असतात व त्यांच्यामधून चिखल व वायूंचे उत्सर्जन होत असते. अशा उत्सर्जनामुळे सरोवराच्या तळाशी निर्माण झालेली स्थिती आता या दोन ठिकाणी आढळून आली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT