विश्वसंचार

समुद्रात बुडालेल्या अकरा हजार वर्षांपूर्वीच्या भिंतीचा शोध

Arun Patil

बर्लिन : जर्मनीजवळ बाल्टिक समुद्रात पुरातत्त्व संशोधकांनी बुडालेल्या अकरा हजार वर्षांपूर्वीच्या भिंतीचे अवशेष शोधले आहेत. या भिंतीचा वापर त्याकाळी रेनडिअरना अडकवून त्यांची शिकार करण्यासाठी केला जात होता. अशा प्रकारची ही युरोपमधील सर्वात प्राचीन भिंत ठरली आहे.

जर्मनीच्या रेरीक शहराच्या पूर्वेस दहा किलोमीटरवर समुद्रात 70 फूट खोलीवर हे अवशेष सापडले. प्रागैतिहासिक काळातील लोकांनी बांधलेल्या या भिंतीचा वापर शिकारीसाठी केला जात होता. 1670 दगडांनी बांधलेली ही भिंत 975 मीटर लांब आहे. तिची उंची तीन फूट असून रुंदी 6.5 फूट आहे. या भिंतीचा छडा आधी सोनारच्या माध्यमातून लावण्यात आला. त्यानंतर पाण्यात जाऊन ही भिंत प्रत्यक्ष पाहिली गेली. युरोपमधील अशा प्रकारची ही सर्वात जुनी भिंत ठरली आहे.

यापूर्वी मध्य-पूर्वेतही शिकारीसाठी बांधण्यात आलेल्या अशा भिंतीचे अवशेष सापडले होते. वाळवंटातील या भिंतीला 'डेझर्ट काईट्स' असे म्हटले जाते. जर्मनीजवळील ही भिंत खास रेनडिअरना अडकवून शिकार करण्यासाठी बांधली होती. कालौघात समुद्राच्या पाण्याची पातळी बदलली आणि ही भिंत असणारे ठिकाण 'समुर्द्रापणमस्तु' झाले! ही घटना 8500 वर्षांपूर्वीच्या काळात घडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT