वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी अतिशय वेगाने फिरणार्या, तसेच अवतीभोवतीच्या खगोलीय घटकांना आक्रमकपणे खेचून गिळंकृत करणार्या शक्तिशाली कृष्णविवराचा शोध घेतलेला आहे. ‘एम 87’ नावाच्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी असलेले अवाढव्य कृष्णविवर खरोखरच एक ‘राक्षस’ आहे. आपल्या जवळपासच्या सर्वात मोठ्या कृष्णविवरांपैकी हे एक असून, इव्हेंट होरायझन टेलिस्कोपसाठी ते पहिले लक्ष्य ठरले होते. शास्त्रज्ञांनी आता याच इव्हेंट होरायझन टेलिस्कोपच्या प्रसिद्ध प्रतिमांचा वापर करून या महाकाय कृष्णविवराचा नव्याने अभ्यास केला आहे. या अभ्यासातून हा ‘राक्षस’ नेमका किती वेगाने फिरत आहे आणि किती प्रमाणात वस्तू गिळंकृत करत आहे, हे शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे.
या अभ्यासाचे निष्कर्ष थक्क करणारे आहेत. आपल्या सूर्यापेक्षा 6.5 अब्ज पट वस्तुमान असलेले हे कृष्णविवर, विश्वातील सैद्धांतिक कमाल वेगाच्या (ींहशेीशींळलरश्र ारुर्ळाीा ीशिशव) सुमारे 80 टक्के वेगाने फिरत आहे. या वेगाची कल्पना करण्यासाठी, त्याच्याभोवती फिरणार्या वस्तूंच्या तबकडीचा (रललीशींळेप वळीज्ञ) आतील भाग प्रकाशाच्या वेगाच्या सुमारे 14 टक्के वेगाने म्हणजेच सुमारे 4 कोटी 20 लाख मीटर प्रतिसेकंद इतक्या प्रचंड वेगाने फिरत आहे.
शास्त्रज्ञांच्या पथकाने कृष्णविवराच्या मूळ प्रतिमांमधील ‘तेजस्वी ठिपक्याचा’ अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. ही असंतुलित चमक केवळ दिखाव्यासाठी नाही, तर ती सापेक्षतावादी ‘डॉप्लर बीमिंग’ नावाच्या प्रक्रियेमुळे निर्माण होते. तबकडीच्या एका बाजूला असलेले पदार्थ आपल्या दिशेने इतक्या वेगाने येत असतात की, ते आपल्यापासून दूर जाणार्या पदार्थांपेक्षा खूप जास्त तेजस्वी दिसतात. या तेजस्वीपणातील फरकाचे मोजमाप करून शास्त्रज्ञांनी कृष्णविवराच्या फिरण्याचा वेग मोजला; पण खरी रंजक बाब यापुढे आहे.
संशोधकांनी कृष्णविवराभोवतीच्या चुंबकीय क्षेत्राच्या रचनेचाही अभ्यास केला, जी रचना वस्तू आत कशा खेचल्या जातात याचा नकाशाच दर्शवते. त्यांना असे आढळून आले की, वस्तू सुमारे 7 कोटी मीटर प्रतिसेकंद म्हणजेच प्रकाशाच्या वेगाच्या सुमारे 23 टक्के वेगाने कृष्णविवरात ओढल्या जात आहेत. या मोजमापाच्या आधारावर, शास्त्रज्ञांनी असा अंदाज लावला आहे की, ‘एम 87’चे कृष्णविवर दरवर्षी सुमारे 0.00004 ते 0.4 सौर वस्तुमानाइतके पदार्थ गिळंकृत करत आहे. हे प्रमाण खूप जास्त वाटू शकते; परंतु इतक्या मोठ्या कृष्णविवरासाठी ते प्रत्यक्षात खूपच माफक आहे.