एकापेक्षा अधिक उल्कापातांमुळे नष्ट झाले डायनासोर Pudhari Photo
विश्वसंचार

एकापेक्षा अधिक उल्कापातांमुळे नष्ट झाले डायनासोर

एक लघुग्रह पृथ्वीवर आदळला त्यातच डायनासोरांसह सुमारे 75 टक्के प्रजाती नष्ट

पुढारी वृत्तसेवा

लंडन ः एकेकाळी या पृथ्वीतलावर वेगवेगळ्या प्रजातीच्या, आकाराच्या शाकाहारी व मांसाहारी डायनासोरचेच साम—ाज्य होते. पाण्यात राहणारे व आकाशात उडू शकणारे डायनासोरही त्या काळात होते. सुमारे 66 दशलक्ष वर्षांपूर्वी सहा मैल लांबीचा एक लघुग्रह पृथ्वीवर आदळला आणि त्यातच डायनासोरांसह सुमारे 75 टक्के प्रजाती नष्ट झाल्या, असे प्रचलित सिद्धांत सांगतो. परंतु, नवीन संशोधन एका वेगळ्याच घटनेवर प्रकाश टाकत आहे. डायनासोर नष्ट होण्यासाठी ही एकच घटना कारणीभूत झाली नव्हती. अलीकडेच गिनीच्या किनार्‍यावर पाण्याखाली सापडलेल्या एका खड्ड्यावरील संशोधनातून शास्त्रज्ञ एका निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, त्याकाळी पृथ्वीवर अनेक उल्का कोसळल्या होत्या. ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रकाशित शोधनिबंधात त्यांनी म्हटले आहे की, आणखी एक मोठी उल्का पृथ्वीवर आदळली असावी, त्यामुळे डायनासोर नामशेष होण्यास हातभार लागला असेल.

स्कॉटलंडमधील हेरियट-वॉट विद्यापीठाने नादर नावाच्या दुसर्‍या खड्ड्याच्या त्रिमितीय प्रतिमा प्रसिद्ध केल्या आहेत. हा खड्डा एका उल्कापातामुळे तयार झाला आहे. या स्फोटाने साडेपाच मैलापेक्षा मोठा खड्डा तयार केला आहे. संशोधकांचा असा अंदाज आहे की, ही उल्का सुमारे 1/4 मैल लांबीची होती आणि पृथ्वीवर आदळताना तिचा वेग ताशी 45 हजार किमीपेक्षा जास्त होता. ही उल्का डायनासोरच्या सामूहिक नाशासाठी जबाबदार असलेल्या लघुग्रहापेक्षा आकाराने लहान असली, तरीही यामुळे एकत्रितपणे अधिक मोठा परिणाम निर्माण झाल्याचे दिसतो. डॉ. उइस्डियन निकोलसन, हेरीयट-वॉट विद्यापीठातील मरीन जिओलॉजिस्ट आहेत. त्यांनी 2022 साली नादर खड्ड्याची प्रथम ओळख पटवली. परंतु, या घटनेमुळे नेमके काय परिणाम झाले याची कल्पना नव्हती. याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की, “नवीन संशोधन हे या विनाशकारी घटनेचे नेमके चित्र उभे करते.”

डॉ. निकोलसन यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या टीमला खात्री आहे की, समुद्रतळावर झालेल्या उल्कापातामुळे 9 किलोमीटरचा खोलगट भाग तयार झाला आहे. परंतु, या घटनेचा नेमका काळ कोणता म्हणजे मेक्सिकोमधील 160 कि.मी. आकाराचा चिक्सुलुब खड्डा निर्माण करणार्‍या लघुग्रहाच्या धडकेपूर्वी किंवा नंतर ही घटना घडली, याबाबत त्यांना अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. या प्रभावाविषयी अधिक जाणून घेण्यासाठी, शास्त्रज्ञांनी थ—ीडी भूकंप इमेजिंगचा अवलंब करून या विवराचा आणि समुद्राच्या तळाच्या 300 मीटर खाली आढळणार्‍या इतर विविध भूभौतिकीय प्रभावांचा नकाशा तयार केला. “जगभरात सुमारे 20 समुद्री खड्डे निश्चित केले गेले आहेत आणि त्यापैकी कोणत्याही खड्ड्याचे इतक्या तपशिलात चित्रण झालेले नाही. हे चित्रण अतिशय उत्कृष्ट आहे,” असे निकोलसन यांनी सांगितले. खड्ड्यांचा तळ हा छिन्नविच्छिन्न किंवा घासला गेलेला आहे. विशेषतः, हा खड्डा हजारो वर्षे जुना असल्यामुळे तळाचा शोध लावणे कठीण जाते. संशोधनानुसार, या उल्केच्या धडकेमुळे जोरदार भूकंप झाले. त्यामुळे महासागराच्या तळाखाली मऊ आणि ओलसर भूमी तयार झाली. या धडकेमुळे भूस्खलन झाले आणि 800 मीटरपेक्षा उंच प्रचंड लाट तयार झाली, जी अटलांटिक महासागरभर पसरली असावी, असे अभ्यासक सांगतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT