Digital detox challenge | ‘डिजिटल डिटॉक्स’ चॅलेंजने बदला तुमचे आयुष्य! 
विश्वसंचार

Digital detox challenge | ‘डिजिटल डिटॉक्स’ चॅलेंजने बदला तुमचे आयुष्य!

पुढारी वृत्तसेवा

लंडन : आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाने वेढलेल्या युगात ‘डिजिटल डिटॉक्स’ हा शब्द सातत्याने चर्चेत येत आहे. डिजिटल डिटॉक्स म्हणजे काही काळासाठी मोबाईल, लॅपटॉप आणि इतर गॅजेटस्पासून पूर्णपणे लांब राहणे. सतत फोन चेक करण्याची सवय ही आता अनेकांसाठी एक व्यसन बनली आहे, ज्यातून बाहेर पडणे कठीण होत चालले आहे. तंत्रज्ञानाचा त्याग करणे नव्हे, तर त्याचा वापर मर्यादित करून स्वतःसाठी वेळ काढणे हाच डिजिटल डिटॉक्सचा मुख्य उद्देश आहे.

अनेक संशोधनांतून असे समोर आले आहे की, दिवसातून किमान एक तास डिजिटल डिटॉक्स केल्याने झोपेच्या गुणवत्तेत मोठी सुधारणा होते. यामुळे शरीरात ऊर्जा वाढते आणि सर्जनशीलता किंवा कल्पकता विकसित होते. न्यूरोसायन्सच्या अभ्यासानुसार, मेंदूला ताजेतवाने करण्यासाठी मोठ्या आरामापेक्षा लहान-लहान ‘ब्रेक्स’ची जास्त गरज असते. गॅजेटस्पासून दूर राहिल्याने मानसिक थकवा कमी होऊन एकाग्रता आणि विचार करण्याची क्षमता वाढते.

डिजिटल डिटॉक्स कसे करावे?

लहान सुरुवात करा : एकदम दीर्घकाळ फोनशिवाय राहणे कठीण असल्यास सुरुवातीला आठवड्यातून एक दिवस किंवा दररोज एक तास गॅजेटस्पासून लांब राहा.

‘नो फोन’ संडे : डिजिटल डिटॉक्ससाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस आहे. सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत फोन बंद ठेवा किंवा दुसर्‍या खोलीत ठेवून द्या.

नोटिफिकेशन बंद करा : फोनमधील अनावश्यक नोटिफिकेशन बंद ठेवा. केवळ महत्त्वाचे कॉल्स आणि मेसेज सुरू ठेवा.

ब्लॅक अँड व्हाईट मोड : फोनची स्क्रीन ‘ब्लॅक अँड व्हाईट’ मोडवर ठेवा. रंगीत स्क्रीन डोळ्यांना आणि मेंदूला जास्त आकर्षित करतात, तर साधा मोड डोपामाइनचा प्रभाव कमी करण्यास मदत करतो.

छंद जोपासा : सोशल मीडियावर ‘रील्स’ पाहण्याऐवजी चित्रकला, डायरी लिहिणे किंवा निसर्गाच्या सानिध्यात फिरणे सुरू करा.

जेवताना फोन नको : जेवताना टीव्ही किंवा फोन पाहणे टाळा. जेवणाचा आस्वाद घेणे हे एक प्रकारचे ‘मानसिक उपवास’ आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT