मानव आणि निएंडरथलमधील चेहर्‍याच्या विकासात फरक का? 
विश्वसंचार

मानव आणि निएंडरथलमधील चेहर्‍याच्या विकासात फरक का?

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन ः आधुनिक मानवांचे (होमो सेपियन्स) चेहरे छोटे आणि सपाट असतात, तर निएंडरथल या लुप्त मानवप्रजातीचे चेहरे मोठे, उभट आणि मजबूत असायचे. हा मोठा फरक का आहे, हे आतापर्यंत वैज्ञानिकांसाठी गूढ होते. मात्र, नव्या संशोधनानुसार, मानवी चेहर्‍याची वाढ वयाच्या लवकर टप्प्यातच थांबते, तर निएंडरथलांच्या चेहर्‍याची वाढ तारुण्यातही सुरू राहते.

‘जर्नल ऑफ ह्युमन इव्होल्युशन’ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात, संशोधकांनी होमो सेपियन्स, निएंडरथल आणि चिम्पांझी यांच्या 174 कवटींचे विश्लेषण केले. त्यांनी बाल्यावस्थेपासून प्रौढावस्थेपर्यंतच्या नमुन्यांचा अभ्यास करून फेशिअल ऑण्टोजेनी (facial ontogeny) म्हणजेच, चेहर्‍याच्या हाडांची वाढ आणि विकास कसा होतो, हे तपासले.

संशोधकांनी दोन पद्धती वापरून हा अभ्यास केला: 3डी डिजिटल मॉडेलिंगः कवटींची आभासी मॉडेल्स तयार करून 200 हून अधिक ठिकाणी मोजमाप करण्यात आले. मायक्रोस्कोपिक विश्लेषणः हाडांच्या वाढीची प्रक्रिया तपासण्यासाठी सूक्ष्म विश्लेषण करण्यात आले. संशोधकांना आढळले की, निएंडरथल जन्मापासूनच मोठ्या आणि पुढे आलेल्या चेहर्‍याची वाढ दर्शवतात. त्यांच्या हाडांच्या वाढीमध्ये हाडनिर्मिती (bone formation) जास्त प्रमाणात होते. आधुनिक मानवांमध्ये हाडाच्या झिजण्याची प्रक्रिया जास्त प्रमाणात दिसून येते, ज्यामुळे त्यांचा चेहरा लहान आणि सपाट राहतो. चिम्पांझी आणि निएंडरथल यांची चेहर्‍याची वाढ अधिक वेगाने होते, तर आधुनिक मानवांमध्ये ती लवकरच थांबते. ‘आधुनिक मानवांमध्ये लवकर थांबणारी चेहर्‍याची वाढ ही एक अनोखी वैशिष्ट्य आहे, असे संशोधक अलेक्झांड्रा शू यांनी स्पष्ट केले. यापूर्वी वैज्ञानिकांनी निएंडरथलच्या मोठ्या चेहर्‍यांबद्दल अनेक सिद्धांत मांडले होते. थंड हवामानाशी जुळवून घेण्यासाठी मोठ्या नाकाची आवश्यकता, ऊर्जेच्या जास्त गरजांमुळे अधिक मोठे जबडे, कठीण अन्न चावण्याच्या क्षमतेत वाढ, दातांचा वापर साधनांसारखा करणे.

आधुनिक मानवात चेहर्‍याचा आकार कमी होण्यामागील ही काही कारणे ः स्वयंपाकाच्या शोधामुळे अन्न मऊ झाले आणि जबड्याचा आकार कमी झाला. मेंदूच्या आकारात वाढ झाल्यामुळे, चेहर्‍याचा आकार तुलनेने लहान झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT