विश्वसंचार

जिथे हिरेही अक्षरश: विखरून पडलेले असतात!

Arun Patil

वॉशिंग्टन : जगात अशा अनेक जागा आहेत, जिथे राहणारा प्रत्येक व्यक्ती लाखो-करोडोंचा मालक असतो. पण, आज आपण अशा जागेबद्दल जाणून घेणार आहोत, जेथे आपण पोहोचलो तरी क्षणभरात करोडपती होऊ शकतो. या जागी चारही बाजूंनी हिरे विखरून पडलेले असतात. इथे अगदी साधा मध्यमवर्गीयदेखील हिरे शोधू शकतो. या ही पेक्षा महत्त्वाचे म्हणजे, येथे ज्याला हिरा मिळतो, तो त्याचा होतो!

तसे पाहता, हिर्‍याच्या खाणीत सर्वसामान्याने जाणे जवळपास अशक्य असते. पण, अमेरिकेच्या आर्कसान्स स्टेटमध्ये अशी एक खाण आहे, जिथे आताही कोणीही जाऊ शकते. आर्कसान्स नॅशनल पार्कमध्ये स्थित 37.5 एकर शेतीत बर्‍याचदा हिरे मिळून येतात. 1906 पासूनच येथे हिरे मिळणे सुरू झाले होते. आतापर्यंत हजारोंच्या संख्येने हिरे येथे शोधले गेले आहेत. सर्वात प्रथम जॉन डहलस्टोन या व्यक्तीने येथे हिरा शोधला होता. त्यांना त्यावेळी दोन चमकते हिरे सापडले होते. तेव्हापासून या जागेला 'द क्रेटर ऑफ डायमंडस्' असे म्हटले जाते. नंतर जॉनने आपली 243 एकर जमीन एका हिर्‍यांच्या कंपनीला महागड्या दरात विकली.

हिर्‍यांच्या कंपनीची ही जमीन 1972 मध्ये नॅशनल पार्कच्या हिशात आली आणि नॅशनल पार्कने ती कंपनीकडून खरेदी केली. त्यानंतर येथे सर्वसामान्यांना देखील ये-जा करण्याची परवानगी देण्यात आली. पार्कमधील अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या जमिनीतून 30 हजारांपेक्षा अधिक हिरे शोधले गेले आहेत. पण यातील बरेच हिरे छोट्या साईजचे होते. येथे चार किंवा पाच कॅरेटचे हिरे मिळण्याचे प्रमाणच अधिक राहिले आहे.

आताही या ठिकाणी लोक फक्त हिरे शोधण्यासाठीच येत राहतात. अनेकदा तर ते हिरे शोधण्यासाठी दिवसभर येथेच ठाण मांडून राहतात. ज्यांचे नशीब बलवत्तर, त्यांना हिरे मिळत राहतात. एका व्यक्तीला येथे 40 कॅरेटचा हिराही मिळाला होता. हा अमेरिकेत मिळालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हिरा आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT