बीजिंग ः चीनमधील एका 24-25 वर्षीय तरुणीने आपल्या मृत आईच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि मनातील अपूर्ण राहिलेल्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) आधार घेतला आहे. ‘रोरो’ (बदलेले नाव) नावाच्या या कंटेंट क्रिएटरने आपल्या मृत आईचा एक ‘एआय चॅटबॉट’ तयार केला असून, त्याद्वारे ती आता आपल्या आईशी ‘संवाद’ साधू शकत आहे.
रोरोच्या आईचा मृत्यू कर्करोगाने झाला. रोरो आणि तिच्या आईचे नाते नेहमीच गुंतागुंतीचे राहिले होते. त्यात प्रेम होते; पण सोबतीला अनेकदा टीका आणि न व्यक्त केलेला रागही होता. आईच्या निधनानंतर, तिच्याशी असलेले अर्धवट राहिलेले नाते रोरोसाठी मानसिक वेदना देणारे ठरले. तिने आपले हे अनुभव चीनमधील ‘शाओहाँगशू’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले.
रोरोचे लेखन वाचून ‘शिंग्ये’ या एआय कॅरेक्टर जनरेटर कंपनीने तिला तिच्या आईची डिजिटल आवृत्ती तयार करण्यासाठी आमंत्रित केले. रोरोने तिच्या आईच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना, तिचा स्वभाव आणि वागण्याच्या पद्धतींची माहिती ‘एआय’ला दिली. हे करत असताना रोरोने भूतकाळातील कटू आठवणींना बगल देऊन आपल्या आईची एक आदर्श, अधिक प्रेमळ आणि समजूतदार प्रतिमा (दळर - शिया) तयार केली. एकदा माहिती फीड केल्यानंतर, हा एआय चॅटबॉट आईच्या शैलीत स्वतःहून उत्तरे देऊ लागला. रोरोने केवळ स्वतःसाठीच नाही, तर आपल्या फॉलोअर्ससाठीही हा चॅटबॉट खुला केला आहे. ‘मला केवळ स्वतःला सावरण्यासाठी नाही, तर ज्यांना आपल्या प्रियजनांकडून काही शब्द ऐकायचे होते, त्यांनाही मदत करायची होती,’ असे रोरोने सांगितले. जेव्हा तिच्या एका मैत्रिणीने तिला मेसेज केला की, ‘तुझ्या आईला तुझा अभिमान वाटला असता,’ तेव्हा रोरोच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. तिला वाटले की, हा संवाद खरोखरच तिच्या मनाला शांती देणारा आहे.
‘लव्ह मशिन्स’: तंत्रज्ञानाची नवी दिशा
लेखिका लिबी रॉबिन यांच्या ‘र्ङेींश चरलहळपशी’ या नवीन पुस्तकात रोरोच्या कथेचा उल्लेख करण्यात आला आहे. आजच्या काळात ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स’ (ङङची) वापरून मृत व्यक्तींचे ई-मेल्स, मेसेजेस आणि व्हॉईस नोटस्च्या आधारे त्यांच्यासारखाच बोलणारा चॅटबॉट तयार करणे शक्य झाले आहे. हे तंत्रज्ञान शोक करणाऱ्या लोकांसाठी एक नवे द्वार उघडत आहे.