विश्वसंचार

चंद्रापेक्षा दूरवर लेसरने पाठवला डेटा

Arun Patil

वॉशिंग्टन : सायकी अंतराळ यानावर अलीकडेच लाँच केलेल्या 'नासा'च्या डीप स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन्स (डीएसओसी) प्रयोगात प्रथमच चंद्रापेक्षाही अतिशय दूरवर लेसरच्या माध्यमातून डेटा पाठवणे व मिळवण्यात संशोधकांना यश आले आहे. ऑप्टिकल संचारला पृथ्वीच्या खालील कक्षा आणि चंद्राची कक्षा यांच्या दरम्यान प्रदर्शित करण्यात आले. 'डीएसओसी' हा सखोल अंतराळातील पहिले परीक्षण आहे. 'डीएसओसी' प्रयोग अंतराळ यानाच्या संचार पद्धतीला बदलवू शकतो.

या माध्यमातून सुमारे 1.6 कोटी किलोमीटर दूर म्हणजेच पृथ्वी ते चंद्रादरम्यानच्या अंतराच्या सुमारे 40 पट अधिक परीक्षण करण्यात आले. डेटाबरोबर एन्कोडेड लेसरला कॅलिफोर्नियाच्या सॅन दियागो कौंटीतील कॅल्टेक येथील पालोमर वेधशाळेत हेल टेलिस्कोपपर्यंत पाठवण्यात आले. 'नासा'ने म्हटले की हा ऑप्टिकल संचार आतापर्यंतचे सर्वाधिक अंतराचे आहे.

डीएसओसीला आपल्या दोन वर्षांच्या तंत्रज्ञान प्रयोगात पृथ्वीवर उच्च बँडविड्थ परीक्षण डेटा पाठवण्यासाठी कॉन्फ्रिगर करण्यात आले आहे. याचे कारण म्हणजे 'सायकी' मंगळ आणि गुरुदरम्यानच्या लघुग्रहांच्या पट्ट्याकडे जात आहे. टेक डेमोने आपल्या लेसर ट्रान्सिव्हरनंतर 14 नोव्हेंबरला 'पहिला प्रकाश' मिळवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT