डार्क चॉकलेट Pudhari File Photo
विश्वसंचार

Dark Chocolate : हृदयासाठी डार्क चॉकलेट गुणकारी

डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे जाणून घेवूया

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : चॉकलेट बार खाणे कुणाला आवडत नाही? मात्र डार्क चॉकलेट खाणे हे आरोग्यासाठीही लाभदायक ठरते, असे तज्ज्ञ सांगतात. डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनॉयडस् आणि पॉलिफेनाल्ससारखे अँटिऑक्सिडेंटस् असतात, जे ब्लडप्रेशर कमी करण्यास मदत करतात. त्याचबरोबर हृदविकाराचा धोकाही कमी करतात. असे चॉकलेट रक्ताच्या गुठळ्या जमा होण्यापासून रोखते; तसेच नसांमधील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत करते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते.

डार्क चॉकलेट खाल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत

डार्क चॉकलेटमध्ये असलेले फ्लेवोनॉयडस् मेंदूतील रक्तपुरवठा वाढवण्यास मदत करतात. ज्यामुळे मानसिक स्वास्थ आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मूड चांगला राहतो. डिप्रेशनची लक्षणे कमी करण्यास फायदेशीर असतात. संशोधनानुसार, डार्क चॉकलेटचे सेवन केल्याने तणाव कमी होतो आणि मेंदूचा विकास होतो. डार्क चॉकलेटमध्ये अँटिऑक्सिडेंट असते, जे त्वचा फ्री रेडिकल्स होण्यापासून रोखते. हे त्वचा हायड्रेट ठेवते. त्याचबरोबर यातील फ्लेवोनॉयडस् सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करते. दररोज डार्क चॉकलेटचे सेवन केल्यास त्वचा उजळते. डार्क चॉकलेटमध्ये कॅलरी कमी असतात, त्यामुळं भूक नियंत्रित ठेवण्यास मदत होते, तसेच वजन कमी करण्यासही मदत होते. डार्क चॉकलेट खाल्ल्याने चयापचय वाढतो, ज्यामुळे कॅलरी लवकर कमी होतात. मात्र योग्य प्रमाणात डार्क चॉकलेटचे सेवन केले पाहिजे, त्यामुळे वजन नियंत्रित राहते. डार्क चॉकलेटमध्ये थिओब्राेमाईन आणि कॅफीनसारखे घटक असतात, जे शरीराला ऊर्जा पुरवतात, त्यामुळे थकवा कमी होण्यास मदत होते. वर्कआऊट करण्यापूर्वी थोडे डार्क चॉकलेट खाल्ल्याने ऊर्जा वाढते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT