नवी दिल्ली : पहाडी भागात वन्य पशू भटकताना दिसणे हे शहरी भागांच्या तुलनेत अगदी सामान्य आहे; पण म्हणून जंगलातील जनावरांच्या उपस्थितीमुळे तुम्ही आरामात बसू शकत नाही. उत्तराखंडमधील एका कुटुंबासाठी असाच एक थरारक अनुभव समोर आला आहे. या कुटुंबाला कल्पनाही नव्हती की, त्यांच्या घराच्या गेटबाहेर न बोलावलेला पाहुणा त्यांची वाट पाहत उभा आहे.
मनीषा चंद राजपूत यांनी सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांचे कुटुंब रात्री आरामात विश्रांती घेत असावे, तेव्हा त्यांच्या घरातील कुत्र्याने मोठ्याने भुंकायला सुरुवात केली. त्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्य बाहेर आले; पण येथे त्यांच्यासाठी एक मोठा धक्का प्रतीक्षा करत होता. जेव्हा फोनचा कॅमेरा गेटच्या वरून बाहेरच्या बाजूला रोखण्यात आला, तेव्हा समोर एक महाकाय मगर दिसली. ती अगदी अशी वाट पाहत उभी होती की, बघूया कोण बाहेर आले आहे! या प्रकारामुळे कुटुंबात एकच तारांबळ उडाली आणि घरातील कुत्र्याचे भुंकणे आणखीनच वाढले. नेमका याच क्षणी मगरीने उलटी पावले टाकून धूम ठोकली. हा व्हिडीओ पाहणारे यूजर्स मजेशीर कमेंटस् करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे, ‘हे चुकीचे आहे, पाहुण्याला चहा-पाण्याशिवाय परत पाठवत नाहीत.’ तर दुसऱ्या एका यूजरने लिहिले, ‘ही मगरसुद्धा निसर्गसौंदर्य पाहायला (साईटसीईंग) निघाली असावी!’