Crocodile bridge Mars | मंगळावर चक्क ‘क्रोकोडाईल ब्रिज’! 
विश्वसंचार

Crocodile bridge Mars | मंगळावर चक्क ‘क्रोकोडाईल ब्रिज’!

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ‘नासा’च्या ‘पर्सिव्हरेन्स रोव्हर’ने मंगळ ग्रहावर एक नवीन शोध लावला आहे, ज्याने वैज्ञानिक जगतात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावरून असा एक फोटो पाठवला आहे, ज्यामुळे शास्त्रज्ञांमध्ये एका नवीन चर्चेला उधाण आले आहे. रोव्हरने मंगळाच्या पृष्ठभागावर एका खडकाळ संरचनेचा फोटो टिपला आहे. शास्त्रज्ञांनी याला ‘क्रोकोडाईल ब्रिज’ असे नाव दिले आहे. हा फोटो ‘जेझेरो क्रेटर’च्या काठावर घेण्यात आला आहे, जिथे हजारो वर्षे जुने खडक असल्याचा दावा केला जातो.

रोव्हरने पाठवलेल्या या चित्रात एक खडबडीत आणि कमानीसारखी खडकाळ रचना दिसत आहे, जी हुबेहूब एखाद्या मगरीच्या पाठीसारखी दिसते. ही रचना जेझेरो क्रेटरचा तळ आणि त्याचा कडा यांच्या दरम्यानच्या भागात स्थित आहे. जेझेरो क्रेटर हा असा भाग आहे, जो प्राचीन खडकांनी भरलेला आहे. शास्त्रज्ञांच्या मते, येथील बहुतेक खडक लाखो वर्षे जुने आहेत. हे खडक तिथे असणे, हे एकेकाळी मंगळ ग्रहावर पाणी अस्तित्वात असल्याच्या पुराव्यांकडे निर्देश करते.

‘नासा’च्या पर्सिव्हरेन्स रोव्हरने आपल्या ‘मास्टकॅम-झेड’ कॅमेर्‍यांच्या मदतीने शेकडो हाय-रेजोल्यूशन फोटो काढले आहेत. हे सर्व फोटो जोडून एक 360-डिग्री पॅनोरामा तयार करण्यात आला आहे. या फोटोंमुळे शास्त्रज्ञांना मंगळ ग्रहाच्या भौगोलिक रचनेचा प्रत्यक्ष संपर्काशिवाय अभ्यास करण्यास मोठी मदत होणार आहे. ‘क्रोकोडाईल ब्रिज’ हे काही वैज्ञानिक नाव नाही. ‘नासा’च्या टीमने केवळ ओळखण्यासाठी आणि सुलभतेसाठी हे नाव दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT