रेजॅव्हिक : जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे नियम असतात. त्याच प्रमाणे लग्नाचे देखील प्रत्येक देशाचे आपले नियम असतात. काही देशांमध्ये एकाच जोडीदारासोबत आयुष्य घालवण्यावर भर दिला जातो, तर काही ठिकाणी एकापेक्षा अधिक विवाहालाही कायदेशीर मान्यता आहे; मात्र एका देशामध्ये तर अशी अजब व्यवस्था आहे, जिथे दोन लग्न करणं फक्त परवानगीपुरतंच मर्यादित नाही, तर ते एकप्रकारे ‘अनिवार्य‘ मानले जाते. आता हा देश कोणता आणि त्यामागचे कारण काय असावे? हे जाणून घेण्याची उत्सुकता तर असणारच. तर हा देश आहे आइसलंड; पण खरी मेख तर यापुढे लपलेली आहे.
इंटरनेटवर अनेकवेळा यासंदर्भातील दावे पाहायला मिळतात की, आइसलंड सरकारने पुरुषांच्या संख्येच्या तुलनेत स्त्रिया अधिक असल्यामुळे, एका पुरुषाने दोन भार्या केल्यास त्याला सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते किंवा हे एकप्रकारे कायदाच आहे. खरे सांगायचे झाले, तर आइसलंडमध्ये असे कोणतेही अधिकृत कायद्यानुसार दोन लग्न करणे ‘अनिवार्य’ नाही. ही एक इंटरनेटवरील अफवा आहे, जी अनेक व्हायरल पोस्टस्मुळे प्रसिद्ध झाली आहे. इथे कोणालाही जबरदस्तीने दोन विवाह करण्यास सांगितले जात नाही; मात्र दोन लग्न करायला काही हरकत देखील नसते.
काही जुन्या इंटरनेट मिम्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, आइसलंडमध्ये पुरुषांची संख्या कमी असल्यामुळे, स्त्रियांना जोडीदार मिळावा म्हणून बाहेरील पुरुषांनी येऊन विवाह करावा आणि त्यांना सरकारकडून आर्थिक प्रोत्साहनही दिले जाईल.