लंडन : युरोपातील एका देशात नातेसंबंधांबाबत इतका मोकळा विचार आहे की, येथे पुरुषांना अनेक महिलांशी संबंध ठेवण्याचे स्वातंत्र्य दिले जाते. येथील समाज याला गंभीर मुद्दा मानत नाही; कारण येथील नातेसंबंधांचा आधार परस्पर संमती आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यावर टिकून आहे. महिलांनाही या मॉडेलवर कोणतीही हरकत नसते; कारण येथे प्रत्येक नातेसंबंध समजदारीने हाताळला जातो. याच कारणामुळे अनेक लोक या देशाला मस्करीत ‘पुरुषांचा स्वर्ग’ असेही म्हणतात.
येथील ‘नाईट आऊट’ संस्कृती खूप प्रसिद्ध आहे. जोडपी आणि मित्र-मैत्रिणी खुलेपणाने क्लब्स, इव्हेंटस् आणि ओपन पार्ट्यांमध्ये सहभागी होतात आणि नातेसंबंधांना बंधन न मानता खासगी पसंती म्हणून जगतात. उत्तर युरोपातील बाल्टिक क्षेत्रात असलेले लाटविया हे छोटेसे राष्ट्र आपल्या अशा खुल्या सामाजिक विचारसरणीमुळे चर्चेत आहे. येथे प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल खूप उदारमतवादी दृष्टिकोन पाहायला मिळतो. अनेक पुरुष एकाच वेळी चार-पाच मैत्रिणींसोबत रिलेशनशिपमध्ये असतात आणि समाज याला असामान्य मानत नाही. येथील नाते पूर्णपणे परस्पर संमती आणि वैयक्तिक स्वातंत्र्यावर आधारित असतात.
लाटवियामधील या अनोख्या परिस्थितीचे मोठे कारण म्हणजे तेथील लोकसंख्येतील असंतुलन आहे. आकडेवारीनुसार, येथे जर 100 महिला असतील, तर पुरुषांची संख्या फक्त 85 ते 87 च्या दरम्यान आहे. पुरुषांची संख्या कमी असल्यामुळे अनेक नातेसंबंध स्वाभाविकपणे विकसित होतात आणि समाजही त्यांना सामान्य म्हणून स्वीकारतो. लाटवियातील महिला शिक्षण, करिअर आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या बाबतीत खूप प्रगतिशील आहेत. त्या आपले आयुष्य स्वतःच्या इच्छेने घालवण्याचा विचार ठेवतात आणि एखाद्या पुरुषाच्या अनेक मैत्रिणी असण्याला गैर मानत नाहीत. त्यांच्यासाठी पारदर्शकता आणि परस्पर आदर हे अधिक महत्त्वाचे आहेत.
लाटवियाचे लोक त्यांच्या नातेसंबंधात पारदर्शकतेला खूप महत्त्व देतात. ते प्रेमाबद्दल खुला आणि प्रामाणिक दृष्टिकोन ठेवतात, यात कोणतीही फसवणूक किंवा लपवाछपवी नसते. जर जोडीदार दुसऱ्यासोबतही संबंधात असेल, तर स्त्रिया याला वैयक्तिक विश्वासघात मानत नाहीत, तर जीवनाचा एक सामान्य भाग म्हणून स्वीकारतात.