विश्वसंचार

फुफ्फुस आणि मूत्रपिंडांना लक्ष्य बनवत आहे कोरोना

Pudhari News

वॉशिंग्टन : 'द लान्सेट मायक्रोब'मध्ये प्रकाशित एका अभ्यासलेखात म्हटले आहे की कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या फुफ्फुसे व मूत्रपिंडांना इजा झाल्याचे दिसून आले आहे. इंग्लंडमध्ये 'कोविड-19'च्या रुग्णांवर इम्पिरियल कॉलेज लंडन आणि इम्पिरियल कॉलेज हेल्थकेअर एनएचएस ट्रस्टने पोस्टमार्टम एक्झामिनेशन केले होते. यावेळी दहा तपासण्या करण्यात आल्या. शरीरांतर्गत पाच महत्त्वाच्या अवयवांमध्ये मेंदू, हृदय, यकृत, मूत्रपिंड आणि फुफ्फुसांचा समावेश होतो.

तपासणीत नऊ रुग्णांमधील किमान एका मोठ्या अवयवाला थ्राेम्बोसिस म्हणजेच रक्‍ताची गुठळी दिसून आली. या अभ्यासामुळे डॉक्टरांना रुग्णांवरील उपचारासाठी मदत मिळू शकते. डॉ. मायकल ऑस्बर्न या संशोधकाने सांगितले, 'कोविड-19' हा नवा आजार आहे आणि आमच्याजवळ ऑटोप्समध्ये ऊतींना ओळखण्यासाठी मर्यादित संधी आहेत. मात्र, हे अशा प्रकारचे नवे संशोधन आहे जे आतापर्यंतच्या डॉक्टर व संशोधकांच्या धारणेची पुष्टी करते. फुफ्फुसांवर हल्‍ला, थ्राेम्बोसिस आणि प्रतिकारक पेशींची संख्या कमी होणे ही 'कोविड-19' च्या गंभीर प्रकरणांची सर्वात मोठी खासियत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT