भारताच्या समृद्ध वारशात प्राचीन वैज्ञानिक ज्ञानाचा अपार साठा आहे. खगोलशास्त्र, गणित, वैद्यकशास्त्र आणि धातुशास्त्र यासारख्या अनेक क्षेत्रांत भारताने महत्त्वपूर्ण शोध लावले आणि संकल्पना मांडल्या. या शास्त्रज्ञांचे योगदान आजही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी प्रेरणादायक ठरत आहे. प्राचीन भारतातील अशाच विविध विषयांमध्ये अनमोल योगदान दिलेल्या काही तज्ज्ञांची व भारताच्या संपन्न वारशाची ही माहिती...
भारतीय गणिताचे जनक म्हणून ओळखले जाणारे आर्यभट्ट हे एक महान खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ होते. त्यांच्या ‘आर्यभटीय’ ग्रंथात ‘शून्य, दशमान पद्धत आणि’?’ (पाय) चे नेमके वर्णन आढळते. पृथ्वीचे भ्रमण आणि ग्रहणांचा त्यांनी खगोलशास्त्रीय अभ्यास केला होता.
‘सिद्धांत शिरोमणी‘ या ग्रंथातून त्यांनी गणित आणि खगोलशास्त्रात नवी क्रांती केली. त्यांनी सूक्ष्म गणित ( Calculus), त्रिकोणमितीचे प्रमेय आणि ग्रहगतीचे सिद्धांत मांडले. त्यांच्या कार्यामुळे भविष्यातील गणिती संशोधनाची पायाभरणी झाली.
‘भारतीय वैद्यकशास्त्राचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे चरक यांनी ‘चरक संहिता’ लिहिली. या ग्रंथात शरीरशास्त्र, रोगनिदान आणि औषधोपचार यांचे सखोल वर्णन आहे. त्यांनी प्रतिबंधात्मक औषधोपचार आणि समग्र आरोग्य संकल्पना मांडली.
‘शल्यचिकित्सेचे जनक’ म्हणून प्रसिद्ध अशा सुश्रुत यांनी ‘सुश्रुत संहिता’ लिहिली. त्यांनी प्लास्टिक सर्जरी, नेत्र शस्त्रक्रिया आणि अस्थिव्यंगोपचार यांची माहिती दिली. शस्त्रक्रियेसाठी त्यांनी भुलतंत्र आणि विशेष शस्त्रसामग्री विकसित केली होती.
‘वैशेषिक सिद्धांत’ मांडणारे कणाद ऋषी हे भारतातील पहिले परमाणु सिद्धांतकार होते. त्यांनी पदार्थ ‘अणू’ (atom) पासून बनले आहेत ही संकल्पना मांडली. त्यांचा सिद्धांत आधुनिक भौतिकशास्त्राच्या मूलभूत तत्त्वांशी साधर्म्य दर्शवतो.
महान रसायनशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ नागार्जुन यांनी धातुकर्म, संजीवनी प्रक्रिया आणि औषधनिर्मितीवर संशोधन केले. त्यांनी धातू शुद्धीकरण आणि मिश्रधातू निर्मितीचे तंत्र विकसित केले. त्यांचे कार्य पुढील रासायनिक प्रक्रियांच्या संशोधनाचा पाया ठरले.
‘ब्रह्मस्पुटसिद्धांत’ ग्रंथातून शून्याचा स्वतंत्र अंक म्हणून शोध मांडणारे ते पहिले गणितज्ज्ञ होते. त्यांनी बीजगणित, विभाजनाचे नियम आणि घातांक गणित विकसित केले. त्यांच्या कार्यामुळे गणिती आणि खगोलशास्त्रीय संकल्पना पुढे विकसित झाल्या.
खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी वराहमिहिर यांनी ‘बृहत संहिता’ आणि ‘पंचसिद्धांतिका’ ग्रंथ लिहिले. त्यात खगोलशास्त्र, भूगोल, हवामानशास्त्र आणि ज्योतिष यांचा समावेश आहे. त्यांनी खगोलशास्त्रीय गणना आणि भविष्यवाणी तंत्रे विकसित केली.
कुशल अर्थशास्त्री आणि राजनीतिज्ञ चाणक्य (कौटिल्य/विष्णुगुप्त) यांनी ‘अर्थशास्त्र’ लिहिले. त्यांनी प्रशासन, अर्थव्यवस्था आणि युद्धनीती यावर विस्तृत विचार मांडले. त्यांचे तत्त्वज्ञान आधुनिक व्यवस्थापन आणि धोरणांवर प्रभाव टाकते.
योगशास्त्राचे जनक मानले जाणारे पतंजली यांनी ‘योगसूत्र संकलित केले. त्यांनी योगाच्या अष्टांग मार्गाचे (योगाचे आठ टप्पे) विवेचन केले. त्यांचे तत्त्वज्ञान आजही संपूर्ण जगात योगाभ्यासासाठी मार्गदर्शक ठरते.