कॉपर बीच File Photo
विश्वसंचार

सूर्यप्रकाशासह बदलतो ‘त्या’ पानांचा रंग!

ही वृक्षवल्ली ‘कॉपर बीच’ या नावाने ओळखली जाते

पुढारी वृत्तसेवा

शिमला : शिमल्यातील छराबडा येथील राष्ट्रपती निवासात एकही असाही वृक्ष आहे, ज्याची पाने सूर्यप्रकाश बदलत जाईल, त्याप्रमाणे आपला रंग बदलत जातात. हा वृक्ष खालून पाहिला असता त्याची पाने हिरवी असल्यासारखा भास होतो. मात्र, समोरुन पाहिल्यास ती पाने हिरवी नव्हे, तर पूर्णपणे गडद झालेली असतात. आश्चर्य म्हणजे देशभरात अशी केवळ 5 झाडे आहेत. ही वृक्षवल्ली ‘कॉपर बीच’ या नावाने ओळखली जाते.

अशी अनोख्या वृक्षवल्ली केवळ हिमाचलमध्ये आढळते

इंग्रजांच्या काळात त्यांनी शिमला येथे अनेक प्रयोग केले. यातील काही प्रयोग अपयशी ठरले, तर काही प्रयोग कमालीचे यशस्वी ठरले. अशाच एका यशस्वी प्रयोगाची पोचपावती आजही शिमल्यातील छराबडा येथे स्थित राष्ट्रपती निवासात मिळते. अशी अनोख्या प्रकारची वृक्षवल्ली केवळ हिमाचलमध्येच आढळून येते.

सूर्यप्रकाशाप्रमाणे त्याची पाने देखील गडद

या वृक्षवल्लीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश गडद होत जातो, त्याचप्रमाणे त्याची पाने देखील गडद होत जातात. देशात असे केवळ पाच वृक्ष आहेत आणि ते सर्व हिमाचल प्रदेशमध्येच आहेत. यातील तीन वृक्ष राष्ट्रपती निवासात, एक वृक्ष वाईल्ड फ्लॉवर हॉल व एक वृक्ष चायल पॅलेसमध्ये बहरलेले आहेत. इंग्रजांच्या कालावधीतील लष्करी अधिकारी किचनर यांनी याची रोपटी भारतात आणली होती. लॉर्ड किचनर यांना बागकामाचा बराच छंद होता. आता भारतात, ते ही हिमाचलमध्येच असे 5 वृक्ष असले, तरी ब्रिटनमध्ये मात्र अशी वृक्षवल्ली जागोजागी अगदी सहजपणे आढळून येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT