विश्वसंचार

रंग बदलणारा मासा

Arun Patil

जकार्ता ः सरडे, विशेषतः शॅमेलिऑन सरडे ज्या वेगाने आपल्या त्वचेचा रंग बदलत असतात, ते पाहून आपण थक्क होत असतो, मात्र केवळ सरडाच रंग बदलतो असे नाही. ऑक्टोपससारखे काही अन्य जीवही रंग बदलू शकतात. एका इंडोनेशियन प्रजातीचा मासाही असे रंग बदलू शकतो. त्याचे नाव आहे 'सेलेबेस मेडका'.

या माशाचे वैज्ञानिक नाव 'ओरिझियास सेलेबेन्सिस' असे आहे. या माशांवर नुकतेच एक नवे संशोधन करण्यात आले आहे. या प्रजातीच्या नर माशाला छेडल्यावर त्याच्या शरीरावर काळे ठिपके दिसून आले. हा मासा रागावल्यावर काळा रंग धारण करतो. अशा वेळी तो आक्रमक होण्याचीही शक्यता असते. त्याच्याशी पंगा घेताच मिनिटभरातच त्याच्या त्वचेचा रंग असा पालटतो. दोन नरांमध्ये झुंजीचा प्रसंग उद्भवल्यावर त्यांचा रंग असा बदलत असतो. विशेषतः असे काळे ठिपके असणार्‍या अन्य नरावर हे मासे हल्ले करतात. त्रिनिनाडियन गप्पी माशांमध्येही रंग बदलण्याची क्षमता असते.

SCROLL FOR NEXT