कोलंबियात कमी मजुरीच्या निषेधार्थ चौकात टाकला चक्क 15 टन कचरा Pudhari File Photo
विश्वसंचार

कोलंबियात कमी मजुरीच्या निषेधार्थ चौकात टाकला चक्क 15 टन कचरा

पुढारी वृत्तसेवा

बोगोटा : कोलंबियाची राजधानी बोगोटामध्ये कचरा वेचकांनी आपल्या घटत्या उत्पन्नाकडे आणि बिकट परिस्थितीकडे लक्ष वेधण्यासाठी एक अनोखे आंदोलन केले. शहरातील प्रसिद्ध बोलिव्हार चौकात सुमारे 15 टन पुनर्वापर करण्यायोग्य वस्तू, विशेषतः प्लास्टिकच्या बाटल्या टाकून त्यांनी आपला निषेध नोंदवला.

शहरातील 14 कचरा वेचक संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन आयोजित केले होते. त्यांचे म्हणणे आहे की, रिसायकलिंग कंपन्यांकडून त्यांना मिळणारा भाव गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणात घसरला आहे. उदाहरणार्थ, प्रति किलो प्लास्टिकसाठी मिळणारा भाव 75 सेंटवरून 50 सेंटवर आला आहे, ज्यामुळे कचरा वेचकांना केवळ 25 सेंट मिळत आहेत. हे दर किमान राष्ट्रीय वेतनापेक्षाही खूप कमी आहेत.

आंदोलकांनी सरकारकडे योग्य भाव आणि अधिक चांगल्या नियमांची मागणी केली आहे. जर आम्हाला योग्य मोबदला मिळाला नाही, तर कचरा वेचण्यास कोणीही तयार होणार नाही आणि शहरातील कचरा प्रकल्प (लँडफिल्स) पूर्णपणे भरून जातील, अशी भीती एका संघटना प्रतिनिधीने व्यक्त केली. या आंदोलनामुळे कचरा वेचकांच्या महत्त्वपूर्ण कामाकडे आणि त्यांच्या आर्थिक शोषणाकडे जगाचे लक्ष वेधले गेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT