विश्वसंचार

Clothes From Milk: चक्क दुधापासून तयार होतात कपडे!

ज्या दुधाला फाटल्यानंतर तुम्ही खराब म्हणून फेकून देत असता त्यापासून डिझायनर साडी, कुर्ते आणि फॅशनेबल आऊटफिट तयार केले जात असतात

पुढारी वृत्तसेवा

लंडन : ज्या दुधाला फाटल्यानंतर तुम्ही खराब म्हणून फेकून देत असता त्यापासून डिझायनर साडी, कुर्ते आणि फॅशनेबल आऊटफिट तयार केले जात असतात. ऐकायला हे विचित्र वाटले; परंतु दुधापासून कपडे तयार करण्याची इंडस्ट्री सध्या चर्चेत आहे. या कपड्यांना ‌‘मिल्क फॅब्रिक‌’ म्हणतात. हे एक असे कापड आहे जे दिसायला रेशमासारखे मुलायम आणि परिधान करण्यासाठी खूपच आरामदायी असते. दुधापासून तयार होणारे कपडे हे आता थंडीपासूनही बचाव करत आहेत.

एक लिटर दुधापासून सिर्फ 10 ग्रॅम मिल्क फायबर बनते. म्हणजे साधारण एक टी-शर्ट तयार करण्यासाठी 60-70 लिटर दुधाची गरज लागते. त्यामुळेच हे फॅबिक खूपच महाग आहे आणि केवळ प्रिमियम बँडस्‌‍ याचा वापर करू शकत आहेत. यामुळे मार्केटमध्ये मिल्क फॅबिकची किंमत गगनाला भिडलेली आहे. 1 मीटर फॅबिकची किंमत सुमारे 15,000 ते 45,000 रुपयांपर्यंत आहे. त्यामुळे अशी एक साडी घ्यायची झाली तर 3 ते 5 लाख रुपयांचा खर्च येतो. लोक आता प्लास्टिक पासून तयार झालेले पॉलिस्टर सोडून असे फॅबिक निवडत आहेत, जे निसर्गाचे नुकसान न होता तयार होत आहे. याच विचारातून मिल्क फॅबिकचा जन्म झाला. याचे पूर्ण श्रेय जर्मनीच्या एका इनोव्हेटीव्ह कंपनी ‌‘क्यूमिल्क‌’ (Qmilk) ला जाते. ‌‘क्यूमिल्क‌’ हा साधा बँड नाही. ही कंपनी ताजे दूध न वापरता इंडस्ट्रीयल वेस्ट मिल्कचा वापर करते. जे दूध खराब होते त्याला लाखोच्या टनात फेकून दिले जाते.

एकट्या युरोपात सुमारे 20 लाख टन दूध दरवर्षी खराब होते. आणि या खराब दुधाला ‌‘क्यूमिल्क‌’ कंपनी अमूल्य फॅबिकमध्ये रूपांतरित करते. दुधापासून कापड कसे तयार होते, हे जाणून घेऊया. सर्वात आधी दूध नासवले जाते. म्हणजे दुधाला असे प्रोसेस केले जाते की, त्यात ठोस भाग (कर्ड) वेगळा होईल. कर्डपासून केसिन प्रोटिन काढले जाते. हेच प्रोटिन पुढे फॅबिकचा बेस बनते. केसिनला पाण्यात विरघळून लिक्विड तयार केले जाते. त्यामुळे ते मशिनमध्ये सहज प्रोसेस होऊ शकेल. या लिक्विडला स्पिनिंग मशिन तंतूत त्याचे रूपांतर करते. मशिन रेशमासारखे त्याचे पातळ तंतू तयार करते. तयार तंतूना धाग्यासारखे स्पिन केले जाते. यातून फायबर खूपच मुलायम आणि चमकदार होतात. यानंतर धाग्यांना विणून कापड तयार केले जाते. ही संपूर्ण प्रोसेस रसायनाशिवाय होते. त्यामुळे हे फॅबिक 100 टक्के बायोडिग्रेडेबल, स्कीन फ्रेंडली आणि इको फ्रेंडली असते.

दुधापासून कपडे बनवण्याचा इतिहास खूप जुना आहे. इटलीत 1930 मध्ये दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी लोकरीचा तुटवडा झाला होता. तेव्हा इटलीच्या संशोधकानी दुधाच्या प्रोटिनपासून धागा तयार केला. ज्याचे नाव लानिटाल ठेवले. लाना म्हणजे लोकर आणि इटलीतून तयार केले म्हणून लानिटाल. मुसोलिनी सरकारमध्ये हे फॅबिक खूप लोकप्रिय झाले; परंतु युद्ध संपल्यानंतर स्वस्त लोकर आणि सिथेंटिक फॅबिक मार्केटमध्ये आल्याने लानिटाल हळूहळू कमी झाले. आता नव्वद वर्षांनंतर पुन्हा 2025 मध्ये या टेक्नॉलॉजी ग्रँडचे पुनरागमन झाले आहे. यावेळी फॅशनच्या जगात हे मोठा बदल घडवेल, असे म्हटले जात आहे. हे दुधाचे कापड रेशमापेक्षा 3 पट जास्त मुलायम असते. ॲन्टी-बॅक्टीरियल असल्याने घामाची दुर्गंधी येत नाही. थर्मल-रेग्युलेटेड म्हणजे थंडीत उष्ण आणि उकाड्यात थंड राहते. ॲलर्जी-फ्री असल्याने संवेदनशील त्वचेच्या लोकांना हा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT