Chinese woman Hanuman Chalisa | चिनी महिला बाळाला ऐकवते हनुमान चालिसा! 
विश्वसंचार

Chinese woman Hanuman Chalisa | चिनी महिला बाळाला ऐकवते हनुमान चालिसा!

पुढारी वृत्तसेवा

बीजिंगः संत तुलसीदासांनी अवधी भाषेत लिहिलेले हनुमान स्तोत्र म्हणजे ‘हनुमान चालिसा’. देशातील घरोघरी या स्तोत्राचे पठण होत असते; पण ते अमेरिकेत राहणारी एखादी चिनी महिलाही स्वतः ऐकेल व आपल्या बाळालाही ऐकवेल याची आपण कल्पना करणार नाही. आपल्या रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी ती या स्तोत्राचा उपयोग करीत असते!

बाळ रडायला लागल्यावर घरात आई-बाबांची धावपळ सुरू होते. मग ते बाळ कोणत्या देशातलं काही असेना, आई-बाबांची धावपळ ठरलेली असते; पण अमेरिकेत राहणाऱ्या या चिनी महिलेने यावर ही ‘रामबाण’ उपाययोजना केली आहे, ज्यामुळे तिच्या बाळाने कितीही चिडचिड केली, तरी ते हा उपाय करताच शांत होते आणि झोपीही जाते. बाळ रडायला लागलं की, ही महिला थेट हनुमान चालिसा लावते. तिच्या म्हणण्यानुसार, हनुमान चालिसा सुरू केल्यानंतर तिचं बाळ अवघ्या ५ सेकंदात शांत होतं आणि २ मिनिटांत झोपीही जातं. याबाबतची माहिती महिलेने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. या महिलेचं नाव सारा जेन हो असून, ती चिनी वंशाची व्यावसायिक महिला आहे.

ती अमेरिकेतली लॉस एंजेलिसमध्ये राहते. वयाच्या ४० व्या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून ती आई झाली. तिचे बाळ हे ४ महिन्यांचे आहे. आई झाल्यानंतर सारा आपल्या बाळाच्या रोजच्या दिनचर्येबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असते. त्यात तिने बाळ रडल्यावर त्याला शांत करण्यासाठी हनुमान चालिसा लावण्याचा अनुभवही शेअर केला. साराने तिच्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, हनुमान चालिसाबद्दल तिला तिच्या भारतीय मित्रांकडून माहिती मिळाली. अमेरिकेतली ‘बर्निंग मॅन’ या कार्यक्रमासाठी तिची काही भारतीय मित्रांशी ओळख झाली होती. त्यांच्याकडून तिने हनुमान चालिसा ऐकली तिचे माहात्म्य ऐकले, त्यानंतर तिने तिच्या बाळाला ऐकवली. सारा बाळाला फक्त हनुमान चालिसाच नाही, तर ब्रह्मर्षी अंगाईदेखील ऐकवते. संगीतामुळे बाळाचा चांगला विकास होतो. विकासाला एक चांगले वळण मिळते असे तिला वाटते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT