कोंबडीपासून बनवलेल्या डिशची महागड्या दराने विक्री 
विश्वसंचार

चीनमध्ये ‘संगीत ऐकवून, दूध पाजवून वाढवलेल्या’ कोंबडीचे मांस!

कोंबडीपासून बनवलेल्या डिशची महागड्या दराने विक्री

पुढारी वृत्तसेवा

शांघाय ः चिन्यांच्या अजब देशातील हे नवेकोरे, (लेटेष्ट!) अजब!... शांघायच्या एका रेस्टॉरंटचा एक अजब दावा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या रेस्टॉरंटच्या मालकाचा दावा आहे की त्यांनी एका खास जातीच्या कोंबडीला धान्य किंवा नेहमीचे अन्न न देता दूध पाजले आणि तिचे संगोपन संगीत ऐकवून केले. आता या कोंबडीच्या मांसाची डिश ग्राहकांना दिली जात आहे. या कोंबडीपासून बनवलेली डिश त्यांनी महागड्या दराने विकली आहे.

एका क्लब रेस्टॉरंटने सांगितले की त्यांनी ‘सनफ्लॉवर चिकन’ नावाच्या दुर्मीळ जातीच्या कोंबडीला लहानपणापासून संगीत ऐकवले आणि दूध दिले. या खास प्रकारे वाढवलेल्या कोंबडीपासून बनवलेली डिश तब्बल 480 युआन (सुमारे 5667 रुपये) मध्ये ग्राहकांना दिली गेली. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, एका बिझनेसमन आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसरने या रेस्टॉरंटमध्ये चिकनचे ऑर्डर दिले, पण जेव्हा त्याला बिल मिळाले, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. जेव्हा त्याने किमतीचे कारण विचारले, तेव्हा स्टाफने सांगितले की हे सामान्य चिकन नाही, तर खास पद्धतीने वाढवले गेले आहे. या दाव्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले आणि चर्चा सुरू झाली की हे खरोखर शक्य आहे का? जिमू न्यूजच्या रिपोर्टनुसार, काही कोंबड्यांना क्लासिकल म्युझिक ऐकवले जाते जेणेकरून त्या शांत राहतील आणि चांगली अंडी देतील. मात्र, त्यांना दूध पाजले जाते हा दावा संशयास्पद आहे. बि—स्टल युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, कोंबड्यांवर संगीताचा परिणाम होतो. त्यांना पॉप, रॉक आणि क्लासिकल म्युझिक ऐकवले गेले आणि त्यांचा प्रतिसाद सकारात्मक दिसला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT