चीन जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे.  File Photo
विश्वसंचार

आता ‘त्या’ धरणापेक्षाही मोठे धरण बांधणार चीन

China Large Dam Project | ब्रम्हपुत्रा नदीवर बांधल्या जाणार्‍या धरणाचा भारताला धोका

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : जगातील सर्वात मोठे धरण हे चीनमध्ये आहे. ‘थ्री गॉर्जेस डॅम’ असे या धरणाचे नाव आहे. या धरणाची शक्ती इतकी आहे की, यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी झाला आहे. मात्र, आता चीनने यापेक्षा मोठी आणि यापेक्षा शक्तिशाली धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रम्हपुत्रा नदीवर बांधल्या जाणार्‍या या धरणाचा सर्वाधिक धोका भारताला होणार आहे. चीन या धरणाचा वापर भारताविरोधात धोरणात्मक शस्त्र म्हणून करणार आहे.

जगातील हे सर्वात मोठे धरण चीन बांधणार आहे. चीनची अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआने जिनपिंगने सोशल मीडियाद्वारे या धरण प्रकल्पाची अधिकृत घोषणा केली आहे. भारताच्या सीमेजवळील ब्रम्हपुत्रा नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे. चीनने या धरण प्रकल्पाचे वर्णन ‘पृथ्वीवरील सर्वात मोठा प्रकल्प’ असे केले आहे. जगातील हे सर्वात मोठे धरण बांधण्यासाठी चीन 137 अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे. हे धरण तिबेटमध्ये भारतीय सीमेजवळ बांधले जाणार आहे. ज्यामुळे भारत आणि बांगला देश या दोन्ही देशांसाठी हे धरण धोकादायक ठरू शकते. हे धरण हिमालयाच्या त्या भागात बांधले जाणार आहे, जिथून ब्रम्हपुत्रा नदी मोठा यू-टर्न घेते आणि अरुणाचल प्रदेशात येते आणि नंतर बांगला देशकडे जाते. सुमारे 2900 कि.मी. लांबीची ब्रम्हपुत्रा नदी भारतात येण्यापूर्वी तिबेटच्या पठारावरून वाहते. ही नदी तिबेटमध्ये पृथ्वीवरील सर्वात खोल खंदक बनते. तिबेटी बौद्ध भिक्षू याला अतिशय पवित्र मानतात.

भारताच्या सीमेजवळील मुसळधार पावसाच्या भागात चीन हे धरण बांधणार आहे. हे धरण दरवर्षी 300 अब्ज किलोवॅट वीज निर्मिती करेल. सध्या, चीनचे ‘थ्री गॉर्जेस डॅम’ हे वीज निर्मितीच्या बाबतीत जगातील सर्वात मोठे धरण आहे. येथे दरवर्षी 88.2 अब्ज किलोवॅट वीज निर्मिती होते. नव्याने बांधले जाणारे हे धरण थ्री गॉर्जेस डॅमच्या 3 पट वीज निर्मिती करणार आहे. थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. चीनच्या हुबेई प्रांतात असलेले थ्री गॉर्जेस धरण यांग्त्झी नदीवर बांधले आहे. या धरणामुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग थोडा कमी झाला आहे. त्यामुळे एका दिवसाचा वेळ सुमारे 0.06 मायक्रोसेकंदांनी वाढला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT