विश्वसंचार

Space War : चीनने अंतराळातच उपग्रहात यशस्वीरीत्या इंधन भरले ?

‘सिक्रेट मिशन’मुळे अमेरिकेसह जगभरातील गुप्तचर यंत्रणा चिंतेत

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : येणाऱ्या काळात महासत्तांमधील युद्ध जमिनीवर किंवा समुद्रात नाही, तर थेट अंतराळात लढले जाईल, असे म्हटले जात आहे. चीनने या ‘स्पेस वॉर’ची गुप्तपणे सुरुवात केल्याचे चिन्हे दिसत आहेत. एका अहवालाने जगभरातील अंतराळ आणि गुप्तचर यंत्रणांची झोप उडवली आहे. चीनने पृथ्वीच्या कक्षेत आपल्या एका उपग्रहामध्ये इंधन भरण्याचे गुप्त ऑपरेशन पार पाडल्याचा दावा केला जात आहे. हा दावा सत्य असल्यास अंतराळात अमेरिका आणि चीनदरम्यान एका अत्यंत धोकादायक शस्त्रास्त्र स्पर्धेच्या नव्या युगाची सुरुवात मानली जात आहे.

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्‍ट’च्‍या वृत्तानुसार, चीनच्या संशोधकांनी असा दावा केला आहे की देशाने जास्त उंचीवरील नेव्हिगेशन उपग्रहावर ‘इन-ऑर्बिट रिफ्युलिंग’चे एक अनोखे ऑपरेशन पूर्ण केले आहे. मात्र, अलीकडील वैज्ञानिक पेपर्स आणि उपग्रह तज्ज्ञांच्या मते, ऑर्बिटल ट्रॅकिंग डेटावरून ही मोहीम खरोखर पार पडली होती की नाही, याबद्दल शंका उपस्थित होत आहे. चीन सरकारच्या मदतीने चालणाऱ्या ‘डीप स्पेस एक्सप्लोरेशन लॅबोरेटरी’ आणि ‘चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या अभ्यास अहवालात नमूद केले आहे की, सर्व्हिसिंग स्पेसक्राफ्ट ‘शिजियान-२५’ ने फेब्रुवारी २०२५ मध्ये ‘बेईडू-२ जी७’ उपग्रहाला १४२ किलोग्रॅम प्रोपेलंट (इंधन) ट्रान्सफर केले. यामुळे या नेव्हिगेशन ऑर्बिटरचे काम करण्याचे आयुष्य आठ वर्षांनी वाढले आहे. कक्षांमध्येच उपग्रहांमध्ये इंधन भरल्याने नवीन उपग्रह पाठवण्याचा खर्च खूप कमी होऊ शकतो आणि नागरिक व लष्करासाठी मार्गदर्शन प्रणालीची ताकद वाढू शकते. या तंत्रज्ञानामुळे अमेरिकेत मोठी चिंता निर्माण झाली आहे.

अमेरिकन स्पेस कमांडच्या अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, अंतराळात इंधन भरण्याच्या क्षमतेमुळे कक्षेत होणाऱ्या संघर्षादरम्यान शत्रूला धोरणात्मक आघाडी मिळू शकते. यूएस स्पेस फोर्सच्या ऑर्बिटल ट्रॅकिंग रेकॉर्डसने या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्वतंत्र खगोलशास्त्रज्ञ जोनाथन मॅकडोवेल यांनी स्पष्ट केले की, २०२५ च्या सुरुवातीला जिओस्टेशनरी ऑर्बिटमध्ये ‘बेईडू-२ जी७’ आणि ‘शिजियान-२५’ यांच्यात सुमारे १० लॉन्गिट्यूडिनल डिग्रीचे अंतर होते. सरकण्याच्या वेगाचा विचार करता, ट्रॅकिंग नेटवर्कने लक्ष्य वस्तूंची चुकीची ओळख पटवली नसेल तर, न कळता डॉकिंग (इंधन भरण्यासाठी जोडणे) होणे अशक्यच आहे. चीनने ही कामगिरी साध्य केली आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु जर हे सिद्ध झाले, तर त्याचे अत्यंत गंभीर धोरणात्मक परिणाम होतील. पॉल सिझमॅन्स्की आणि कॅलोएरो बोनासिया यांनी जुलै २०२६ च्या ‘प्रोसीडिंग्स’ लेखात नमूद केले आहे की, हे अंतराळ युद्धाच्या नव्या टप्प्याची सुरुवात असू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT