विश्वसंचार

अंतराळातही पोहोचणार चीन-रशियाची अमेरिकेशी रस्सीखेच

Arun Patil

बीजिंग : चीन व अमेरिकेतील रस्सीखेच आता अंतराळातही पोहोचते आहे. एकीकडे, अमेरिका पुन्हा एकदा चंद्रावर मानव पाठवण्याच्या मोहिमेसाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे, चीनने देखील चंद्रावर बेस स्टेशन उभे करण्याची महत्त्वाकांक्षा नजरेसमोर ठेवली आहे. मात्र, आता चीनच्या जोडीला रशिया देखील आले आहे. रशिया व चीन आता नो लिमिट पार्टनरशिप या मोहिमेला सुरुवात करणार आहे. चिनी माध्यमांनी याला परफेक्ट मॅच असे म्हटले आहे. रशियन सरकारी विधान आयोगाने स्टेशन स्थापनेला यावेळी हिरवा कंदील दर्शवला.

चीन-रशिया व अमेरिका यांच्यात बराच राजकीय तणाव आहे. फेब—ुवारी 2022 मध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनवर हल्ल्याचे आदेश देण्यापूवीर्र् चीन व रशियाने नो लिमिट पार्टनरशिपवर कार्यवाही सुरू असल्याची माहिती दिली होती.

रशिया व चीन आपली ही नवी मोहीम तीन टप्यात राबवणार आहेत. यामध्ये दोन्ही देश बेस स्टेशनसाठी सर्वोत्तम जागा निवडतील. त्यानंतर तेथे कंट्रोल सेंटर उभे करतील, जेणेकरून कार्गो पोहोचणे सुुरू करता येईल. कक्षेत मॉड्यूल उभारले जाईल. या संयुक्त प्रकल्पांमुळे दोन्ही देशांची ताकद एकमेकांसाठी पुरक ठरेल, असे म्हटले जात आहे. काही दशकांपूर्वी तत्कालीन सोव्हिएत युनियन व अमेरिकेत अंतराळात पुढे जाण्यासाठी बरीच स्पर्धा होती. पण, आजच्या घडीला रशियाने काहीही घडवलेले नाही. येथे चीन आर्थिकद़ृष्ट्या निर्णायक वाटा उचलू शकतो. चीन आता अमेरिकेला अंतराळात कडवी टक्कर देत असून त्याचे प्रतिबिंब यापुढेही उमटत राहणार असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT