OpenAI launching Earbuds | ‘चॅटजीपीटी’ बनवणारी ‘ओपन एआय’ आता लाँच करणार ‘इअरबडस्’ 
विश्वसंचार

OpenAI launching Earbuds | ‘चॅटजीपीटी’ बनवणारी ‘ओपन एआय’ आता लाँच करणार ‘इअरबडस्’

पहिल्या एआय डिव्हाईसची माहिती लीक!

पुढारी वृत्तसेवा

सॅन फ्रान्सिस्को : आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या (एआय) जगात क्रांती घडवणारी कंपनी ‘ओपन एआय’ आता हार्डवेअर क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी यावर्षी आपले पहिले ‘एआय-इनेबल्ड’ डिव्हाईस सादर करण्याची शक्यता असून, एका नवीन लीकनुसार हे उत्पादन एक ‘वियरेबल ऑडिओ डिव्हाईस’ म्हणजेच इअरबडस् असणार आहे.

प्रसिद्ध टिप्स्टर ‘स्मार्ट पिकाचु’ ने दिलेल्या माहितीनुसार, ‘ओपन एआय’ च्या पहिल्या इअरबडस्चे नाव ‘डाईम’ (Dime) असे असू शकते. कंपनीने या नावासाठी चीनमध्ये पेटंटदेखील दाखल केले आहे. सुरुवातीला कंपनी या इअरबडस्ची एक साधी आवृत्ती लाँच करेल आणि त्यानंतर अधिक प्रगत एआय फीचर्स असलेले मॉडेल बाजारात आणले जाईल.

‘ओपन एआय’ एका शक्तिशाली ‘फोन-सद़ृश’ कॉम्प्युटिंग डिव्हाईसवरदेखील काम करत होती. परंतु, हाय बँडविड्थ मेमरीच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या खर्चामुळे या प्रकल्पाला विलंब होऊ शकतो. त्यामुळे कंपनी 2026 मध्ये साधी आवृत्ती लाँच करून नंतर प्रगत मॉडेल्स सादर करण्याची योजना आखत आहे. कंपनीचे चीफ ग्लोबल अफेयर्स ऑफिसर क्रिस लेहेन यांनीही यावर्षी पहिले ‘एआय’ डिव्हाईस बनवण्याच्या योजनेला दुजोरा दिला आहे. हार्डवेअरसोबतच सॉफ्टवेअरमध्येही ‘ओपन एआय’ने मोठी झेप घेतली आहे.

कंपनीने ‘GPT-5.3- Codex’ हे नवीन मॉडेल लाँच केले आहे. हे मॉडेल जुन्या आवृत्तीपेक्षा 25 टक्क्यांनी वेगवान आहे. हे केवळ कोड लिहीत नाही, तर अगदी साध्या प्रॉम्प्टवरून जटिल वेब गेम्स तयार करू शकते. प्रेझेंटेशन बनवणे, यूजर रिसर्च, सिस्टम मॉनिटरिंग आणि स्प्रेडशीट अ‍ॅनालिसिस यांसारखी सॉफ्टवेअर लाईफसायकलमधील सर्व कामे हे मॉडेल हाताळू शकते. हे सध्या सर्व ‘पेड’ चॅटजीपीटी यूजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT