शतकभरापूर्वी बुडालेल्या पाणबुडीचे अवशेष सापडले Pudhari File Photo
विश्वसंचार

शतकभरापूर्वी बुडालेल्या पाणबुडीचे अवशेष सापडले

हे अवशेष समुद्राच्या तळावर 1300 फूट (400 मीटर) पेक्षा जास्त खोलीवर आढळले

पुढारी वृत्तसेवा

सॅन दिएगो : संशोधकांनी सॅन दिएगोपासून एक मैल दूर समुद्राच्या तळावर हरवलेल्या दोन लष्करी वाहनांचे अवशेष शोधले आहेत. यातील एक अमेरिकन पाणबुडी 1917 मध्ये मध्ये प्रशिक्षण अपघातात बुडाली होती तर दुसरे यूएस नौदलाचे प्रशिक्षण विमान जे 1950 मध्ये जवळपास कोसळले. यूएसएस एफ-1 पाणबुडी दुसर्‍या यूएस नौदलाच्या पाणबुडीशी झालेल्या धडकेत मोठे नुकसान झाल्यानंतर काही सेकंदात बुडाली होती. त्या अपघातात त्यातील 19 क्रू मेंबर्सचा मृत्यू झाला आणि इतर तिघांना पाणबुडीने वाचवले होते. वुडस् होल ओशनोग्राफिक इन्स्टिट्यूशन आणि यूएस नेव्हीच्या संशोधकांनी या वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या शोध मोहिमेत हे अवशेष शोधण्यात आले. 1917 मध्ये बुडाल्यानंतर प्रथमच पाणबुडीचे अवशेष शोधले गेले आणि त्याचे सर्वेक्षण करण्यात आले. हे अवशेष समुद्राच्या तळावर 1300 फूट (400 मीटर) पेक्षा जास्त खोलीवर आढळले.

मानवासाठी हे अंतर खूपच खोलवर असल्याने तेथे पोहोचणे निव्वळ कठीण होते. त्यामुळे डब्ल्यूएचओआय रिसर्च शिप अटलांटिसवर आधारित मानव-व्याप्त वाहन (एचओव्ही) एल्विन आणि स्वायत्त अंडरवॉटर व्हेईकल (एयूव्ही) सेंट्रीमधील ऑपरेटरद्वारे अवशेषांचे सर्वेक्षण करण्यात आले. डब्ल्यूएचओआयमधील एल्विन गटाचे व्यवस्थापक ब्रूस स्ट्रिक्रॉट यांनी लाईव्ह सायन्सला ईमेलद्वारे सांगितले की, ‘ही दोन महत्त्वाची उपकरणे खूप चांगले काम करतात. ‘दोन क्षमतांच्या एकत्रित सामर्थ्याने समुद्रातील संशोधन आणि अन्वेषण बदलले आहे आणि ते एल्विन वैज्ञानिक मोहिमांचा नियमित भाग बनत आहे.‘यूएस नेव्हीच्या नौदल इतिहास आणि वारसा कमांड पुरातन शास्त्रज्ञ ब—ॅडली क्रुगर काही डायव्हिंग दरम्यान एल्विनमध्ये होते आणि त्यांनी 1917 च्या प्राणघातक घटनेची माहिती दिली.

1917 च्या अपघातात मरण पावलेल्या 19 क्रू सदस्यांसाठी हे अवशेष आता युद्ध स्मारक आहे. डब्ल्यूएचआयवो आणि नौदल यांनी अवशेषांची स्थिती जतन करण्यासाठी आणि त्याच्या वारशाचा आदर करण्यासाठी त्यात कोणतेही बदल न करण्याचे मान्य केले आहे,’ असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT