न्यूयॉर्कः प्रत्येकाला सुद़ृढ आणि निरामय आयुष्य जगायचं असतं; पण स्वतःला कोणतेही नियम लावून घ्यायचे नसतात. अशावेळी 101 वर्षीय न्यूट्रिशनिस्ट डॉ. जॉन शार्फेनबर्ग ज्यांनी आपलं आयुष्य अतिशय सुंदर जगलं आहे त्यांनी याबाबत खास नियम सांगितले आहेत.
त्यांनी आपल्या चिरतरुण जगण्याचे 7 महत्त्वाचे नियम शेअर केले आहेत. शार्फेनबर्गच्या दिनचर्येत व्यायाम हा एक महत्त्वाचा भाग आहे. ते म्हणाले,‘तुम्हाला मिळणार्या आयुष्याचा काळ महत्त्वाचा असतो. तो काळ म्हणजे 40 ते 70 पर्यंतचा. कारण या काळात लोकं जास्त आराम करतात, खातात आणि फक्त बसतात. पण याच काळात थोडी शारीरिक हालचाल अत्यंत महत्त्वाची आहे.’ शार्फेनबर्ग यांनी प्रामाणिकपणे पाळलेला आणखी एक सुवर्ण नियम म्हणजे आयुष्यभर धूम्रपान आणि कोणत्याही प्रकारचे तंबाखू सेवन पूर्णपणे टाळणे. तंबाखूमुळे होणारे गंभीर आरोग्य आव्हाने, ज्यामध्ये अनेक अवयवांचे नुकसान, कर्करोग आणि टाइप 2 मधुमेह यांसारखे आजार समाविष्ट आहेत, याची जाणीव ठेवून, डॉ. शार्फेनबर्गने यांनी लक्ष दिले की ते कधीही त्यांच्या शरीरात या गोष्टींना प्रवेश देणार नाही.
डॉ. शार्फेनबर्ग यांनी मध्यम प्रमाणात मद्यपान केल्याने आरोग्याला फायदा होतो या कल्पनेलाही आव्हान दिले आहे. अनेकांचा असा दावा आहे की, एक छोटा ग्लास वाइन पिणे फायदेशीर ठरू शकते, परंतु हे न्यूट्रिशनिस्ट पूर्णपणे त्याविरुद्ध बोलले असून मद्यपान टाळण्याचाच सल्ला त्यांनी दिला आहे. पोषणतज्ञ अधूनमधून उपवास करतात, एका दिनचर्येचे पालन करतात जिथे ते नाश्ता आणि दुपारचे जेवण घेतात परंतु रात्रीचे जेवण वगळतात. 20 वर्षांचे असल्यापासून त्यांनी मांसाला स्पर्श केलेला नाही. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात मांसाचे सेवन पूर्णपणे कमी करून शाकाहारी आहाराचे पालन करतात. त्यांनी आहारातून साखरेचे प्रमाण जवळजवळ शून्य केले आहे. तज्ज्ञ सांगतात की, लोणी, पाम, नारळाचे तेल, चीज आणि मांस यासारखे पदार्थ टाळण्यावर भर दिला. ‘सर्वात चांगला आहार म्हणजे शाकाहारी आहार. तुम्ही सर्वांनी योग्य जीवनशैली जगावी अशी मी प्रार्थना करतो,’ असे ते म्हणाले.