सतत तहान लागण्यामागे ‘ही’ कारणे... Pudhari File Photo
विश्वसंचार

सतत तहान लागण्यामागे ‘ही’ कारणे...

ही जास्त तहान काही वेळा एका गंभीर आजाराची चाहूल देऊ शकते

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात तहान लागणे हे साहजिक आहे. घाम, उष्णता या सगळ्यामुळे शरीरातल्या पाण्याची पातळी कमी होते आणि ते भरून काढण्यासाठी शरीर आपल्याला पाणी प्यायचे इशारा देते; पण जर तुम्ही सतत पाणी पीत असाल आणि तरीही घसा कोरडा वाटत असेल, तहान भागत नसेल तर हे लक्षण काहीसे चिंताजनक आहे. तहान ही शरीराची गरज आहे, पण काही वेळा ती गरजेपेक्षा जास्त जाणवते. ही जास्त तहान काही वेळा एका गंभीर आजाराची चाहूल देऊ शकते. त्यामुळे ही लक्षणे वेळीच ओळखणे गरजेचे आहे. तज्ज्ञांच्या मते सतत तहान लागण्यामागे ‘ही’ कारणे असू शकतात....

रक्तातील साखरेचे असंतुलन : जर शरीरात साखरेची पातळी खूप वाढलेली असेल, तर किडनी ती बाहेर टाकण्यासाठी अधिक पाणी वापरते. परिणामी, लघवी जास्त होते आणि शरीर पुन्हा पाण्याची मागणी करते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना अनेकदा अती तहान लागते आणि वारंवार लघवी होते.

डिहायड्रेशन : उकाडा, जास्त व्यायाम, उलट्या, जुलाब किंवा लघवीद्वारे शरीरातले पाणी कमी झाले, की शरीरात त्वरित पाणी हवे असते; पण काही वेळा आपल्याला कळत नाही की आपण डिहायड्रेट झालो आहोत.

जास्त मीठ किंवा मसालेदार अन्न : अन्नातले मीठ शरीरातील सोडियमची पातळी वाढवते आणि ते संतुलित ठेवण्यासाठी शरीर जास्त पाण्याची मागणी करते. त्यामुळे रोजच्या जेवणात मीठाचे प्रमाण लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

ताप, संसर्ग आणि झोपेचा अभाव : तापाच्या काळात शरीर गरम होते आणि उष्मा नियंत्रित करण्यासाठी अधिक पाणी गरजेचे असते. त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव आणि अपुरी झोपसुद्धा शरीराच्या द्रव संतुलनावर परिणाम करू शकते.

डायबिटीज : हा आजार मधुमेहापेक्षा वेगळा आहे. यात किडनी पाणी नीट साठवू शकत नाही. त्यामुळे वारंवार लघवी होते आणि सतत तहान लागते.

डॉक्टरांकडे कधी जायचे?

  • जर तुमचे अचानक प्रचंड प्रमाणात तहान वाढल्यास

  • पाणी पिऊनही तहान भागत नसल्यास

  • सतत लघवी होत असल्यास

  • वजन वेगाने कमी होत असल्यास

  • थकवा, चिडचिड, झोपेचा त्रास जाणवत असल्यास

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT