Cat Used for Drug Smuggling | कैद्यांपर्यंत अमली पदार्थ पोहोचवण्यासाठी चक्क मांजरीचा वापर 
विश्वसंचार

Cat Used for Drug Smuggling | कैद्यांपर्यंत अमली पदार्थ पोहोचवण्यासाठी चक्क मांजरीचा वापर

रशियातील धक्कादायक प्रकार

पुढारी वृत्तसेवा

मॉस्को : रशियातील एका तुरुंगात कैद्यांपर्यंत अमली पदार्थ पोहोचवण्यासाठी चक्क मांजरीचा वापर करण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. तुरुंग प्रशासनाने वेळेवर संशयित मांजरीला पकडल्याने हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रशियन फेडरल पेनिटेन्शियरी सर्व्हिस (एफएसआयएन) च्या माहितीनुसार, हा प्रकार पीनल कॉलनी क्रमांक १७ जवळ घडला.

तुरुंग परिसराकडे संशयास्पद हालचाल करणारी एक मांजर कर्मचाऱ्यांच्या नजरेस पडली. तपासणी केली असता तिच्या गळ्यात दोन कापडी कॉलर बांधलेले आढळले. अधिकाऱ्यांनी या कॉलरची तपासणी केली असता त्यामध्ये प्रतिबंधित अमली पदार्थ (ड्रग्ज) लपवण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर कॉलर जप्त करण्यात आले, तर मांजरीला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे सोडून देण्यात आले. या प्रकरणामागील तस्करांचा शोध सुरू असून, तुरुंगातील एखाद्या कैद्याशी या कटाचा संबंध आहे का, याचाही तपास सुरू आहे.

ही पहिलीच घटना नसून, यापूर्वीही विविध देशांमध्ये प्राण्यांच्या माध्यमातून तुरुंगात बंदी असलेले साहित्य पोहोचवण्याचे प्रयत्न समोर आले आहेत. २०२० मध्ये श्रीलंकेतील वेलिकाडा तुरुंगात एका मांजरीकडून हेरॉईन, सिम कार्ड आणि मेमरी चिप जप्त केली होती. तसेच २०२५ मध्ये कोस्टा रिकामध्ये एका मांजरीकडून गांजा आणि क्रॅक कोकेनची पाकिटे सापडली होती. या ताज्या घटनेमुळे तुरुंग सुरक्षेसमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT