विश्वसंचार

गाडीचे रूपांतर झाले चक्क लहान मुलात!

Arun Patil

नवी दिल्ली : शीर्षक वाचून अनेकांना प्रश्न पडेल की हा काय प्रकार आहे?, आपण चित्रपटात गाड्यांपासून रोबोट तयार होत असताना किंवा रोबोचे रूपांतर कारमध्ये होत असताना पाहतो. असे 'ट्रान्सफॉर्मेशन' आपल्याला थक्क करीत असते. मात्र, खेळण्यातील गाडीचे रूपांतर चक्क एका लहान मुलग्यामध्ये होत असताना तुम्ही कधी पाहिले आहे का? होय, असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. अर्थात ही गाडी खरी नसून मुलगा मात्र खरा आहे!

हा व्हिडीओ एका इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही सुरुवातीला एक गाडी पाहू शकता. हा व्हिडीओ बहुधा एखाद्या मॉलमधला दिसतोय. मग या पिवळ्या रंगाच्या गाडीमधून अचानक एका लहान मुलाचं डोकं वर येतं, मग हात बाहेर पडतात अन् ही गाडी बघता बघता उभी राहाते. अन् शेवटी कळतं की ही गाडी नसून चक्क एक लहान मुलगा आहे, जो गाडीचा वेश परिधान करून जमिनीवर झोपलाय.

त्याच्या दोन्ही हातांवर गाडीची पुढील दोन बाजूची चाके बांधलेली असून कंबरेला मागील चाके आहेत. हा मुलगा डोके टेकवून नमस्कार केल्यासारखा खाली बसला की त्याने परिधान केलेल्या या वेशातून गाडीचा आकार येतो. हा व्हिडीओ आतापर्यंत 1 लाखांपेक्षा अधिक नेटकर्‍यांनी पाहिला असून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT