Electric Car Charging | कारचे छतच करणार इलेक्ट्रिक कारचे चार्जिंग! 
विश्वसंचार

Electric Car Charging | कारचे छतच करणार इलेक्ट्रिक कारचे चार्जिंग!

चायनीज कंपनीने बनवला ‘सोलर सनरूफ’

पुढारी वृत्तसेवा

बीजिंग : चीनमधील प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी ‘FAW Hongqi’ने एक असा अनोखा सोलर सनरूफ प्रोटोटाईप सादर केला आहे, जो नवीन काळातील ‘पेरोव्हस्काईट फोटोव्होल्टेइक’ तंत्रज्ञानाचा वापर करतो. हे तंत्रज्ञान इलेक्ट्रिक कारच्या काही भागांना थेट पॉवर जनरेटरमध्ये (वीज निर्माण करणाऱ्या घटकात) रुपांतरित करते. कंपनीने आपल्या ‘Hongqi EHS7’ (चीनमध्ये ‘Tiangong 08’) या इलेक्ट्रिक SUV च्या छतावर हा फुल-साईज सोलर सनरूफ बसवला आहे. यामुळे आता ही कार थेट छतावरून चार्ज होऊ शकणार आहे.

‘इंटरेस्टिंग इंजिनिअरिंग’च्या अहवालानुसार, चांगला सूर्यप्रकाश मिळाल्यास हा सनरूफ ३०० व्हॉटपर्यंत वीज निर्माण करू शकतो. या सनरूफद्वारे वर्षभरात सुमारे ४०० युनिटस्‌ (kWh) वीज तयार होईल, असा अंदाज आहे. या विजेचा वापर केवळ कारची मुख्य बॅटरी चार्ज करण्यासाठीच नव्हे, तर कारमधील एअर कंडिशनर, मिनी फ्रिज आणि सिक्युरिटी-मॉनिटरिंग सिस्टीम चालवण्यासाठीही केला जाईल. आतापर्यंत गाड्यांमध्ये सिलिकॉनचे जड आणि कडक सोलर पॅनेल्स वापरले जायचे, जे कारच्या वळणदार छतावर बसवणे कठीण असायचे. मात्र, ‘पेरोव्हस्काईट’ मटेरियलपासून बनवलेले सोलर पॅनेल्स अत्यंत पातळ, हलके आणि लवचिक असतात.

हे पॅनेल्स कारचे छत, बोनेट किंवा दरवाजांच्या वळणदार भागांवर सहज बसवले जाऊ शकतात. कंपनी हे तंत्रज्ञान कारच्या बोनेट आणि इतर बॉडी पार्टस्‌वरही बसवण्याच्या तयारीत आहे. संपूर्ण कारवर हे सोलर लेयर लावले तर ही गाडी एका दिवसात १० kWh पर्यंत वीज निर्माण करू शकते. योग्य सूर्यप्रकाश आणि हवामान असल्यास, या इलेक्ट्रिक कारला दररोज ८० किलोमीटर चालवण्यासाठी मोफत वीज मिळू शकेल. ज्या कारमध्ये हा प्रोटोटाईप बसवण्यात आला आहे ती Hongqi EHS7 स्वतःही अत्यंत शक्तिशाली आहे. ही कार एकदा फुल चार्ज झाल्यावर ४७५ किलोमीटरपर्यंत धावते आणि तिची पीक पॉवर २५३ kW आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT