विश्वसंचार

‘बीटीएस’च्या गाण्याला चोवीस तासांतच मिळाले दहा कोटी व्ह्यू

Pudhari News

सेऊल : सध्या कोरियन पॉप बँड 'बीटीएस'ने जगभरातील तरुणाईला वेड लावले आहे. 'बीटीएस'ने आता आपला लेटेस्ट ट्रॅक 'डायनॅमाईट'चा म्युझिक व्हिडीओ यू ट्यूबवर अपलोड केला आहे. या के-पॉप व्हिडीओला चोवीस तासांमध्येच दहा कोटी व्ह्यूज मिळाले आणि एक नवा विश्‍वविक्रम घडला. आतापर्यंत या गाण्याला 19 कोटींपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

यापूर्वी यू ट्यूबवर सर्वाधिक वेळा व्हिडीओ पाहिला जाण्याचा विक्रम 'ब्लॅकपिंक'च्या नावावर होता. या बँडचा व्हिडीओ 'हाऊ यू लाईक दॅट'ला चोवीस तासांमध्येच 86.3 दशलक्ष लोकांनी पाहिले होते. संपूर्ण जगात सध्या कोरियन बँडस् लोकप्रिय झाले आहेत. त्यापैकी 'बीटीएस'ने तर तरुणाईला वेड लावले आहे. या बँडमध्ये सात कोरियन मुलं आहेत. त्यांचा 'डायनामाईट' सुपरहिट होणार याचा आधीच अंदाज वर्तवण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच या गाण्याचा एक टीजर व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. तो टीजरच यू ट्यूबवर सहा कोटींपेक्षा अधिक वेळा पाहण्यात आला आहे. '2020 एमटीव्ही व्हिडीओ म्युझिक अ‍ॅवॉर्डस्'मध्ये 'बीटीएस'ला टी.व्ही.वर पहिल्यांदाच डान्स परफॉर्मन्स करताना पाहायला मिळू शकेल. हा कार्यक्रम 30 ऑगस्टला ऑन-एअर होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT