नवी दिल्ली : लोक म्हणतात की, लग्नानंतर एका नव्या आयुष्याची सुरुवात होते. प्रत्येक जोडप्याची या नव्या आयुष्याबद्दल अनेक स्वप्ने असतात. कोणी नवीन ठिकाणी फिरायचा प्लॅन करतो, तर कोणी भविष्यासाठी मोठे बेत आखतो. पण सध्या सोशल मीडिया वर एका नवविवाहित दाम्पत्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. लग्नानंतर नवरीने तिच्या पतीसमोर असा काही ‘पोस्ट-वेडिंग प्लॅन’ (लग्नानंतरचा प्लॅन) ठेवला, की बिचार्या नवर्याच्या चेहर्यावरील हावभाव पाहून इंटरनेटवर हशा पिकला आहे. हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडिया युजर्सचे लक्ष वेधून घेत असून, नेटीझन्सना आपले हसू रोखणे कठीण झाले आहे. या व्हिडीओमध्ये नवरीच्या बोलण्यापेक्षाही नवर्याचे चेहर्यावरील हावभाव हा सर्वात मोठा चर्चेचा विषय बनला आहे.
हा व्हायरल व्हिडीओ डिजिटल क्रिएटर राधिका ग्रोवर हिने तिचा पती अकुल ग्रोवरसोबत शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये दोघेही लग्नाच्या पोषाखांमध्ये दिसत आहेत. सुरुवातीला सर्व काही एका रोमँटिक नवविवाहित जोडप्यासारखे वाटते, पण काही सेकंदांतच संपूर्ण वातावरण कॉमेडीमध्ये बदलून जाते. व्हिडीओमध्ये राधिका तिच्या पतीला सांगते की, ‘माझे आई-बाबा नेहमी म्हणायचे की जेवढं फिरायचं आहे, ते लग्नानंतर फिरा.‘एवढं बोलून ती पतीच्या हातात कागदाची एक भलीमोठी लिस्ट (यादी) सोपवते. आधी तर अकुल अगदी सहजतेने तो कागद हातात घेतो. पण, जसा जसा तो कागद उघडायला लागतो, तसा तसा त्याच्या चेहर्याचा रंग उडू लागतो.
तो कागद इतका लांब असतो की, एखाद्या हॉटेलच्या बिलासारखा दिसतो. पण त्यात खाण्याच्या गोष्टी नसून, फिरण्याच्या ठिकाणांची नावे लिहिलेली असतात. तो कागद पाहून आधी नवर्याच्या चेहर्यावर हलकी स्माईल येते, मग तो आश्चर्यचकित होतो आणि शेवटी त्याच्या चेहर्यावर असे भाव येतात की ते पाहून लोक हसून हसून लोटपोट झाले आहेत. पहिल्या व्हिडीओवर सोशल मीडियावर इतकी चर्चा झाली की, त्यानंतर या जोडप्याने आणखी एक व्हिडीओ शेअर केला. या दुसर्या व्हिडीओमध्ये नवर्याने स्वतःच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे. तो हसतमुख चेहर्याने कॅमेर्यासमोर म्हणतो, ‘ओह माय गॉड... मी तुला घेऊन जाईन, प्रत्येक ठिकाणी घेऊन जाईन.’