Pre-Wedding Photoshoot | प्री-वेडिंग फोटोशूटवेळी फुग्यांसह हवेत उडाली नवरी!  
विश्वसंचार

Pre-Wedding Photoshoot | प्री-वेडिंग फोटोशूटवेळी फुग्यांसह हवेत उडाली नवरी!

तुर्कियेतील अंगावर काटा आणणारा व्‍हिडीओ व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

इस्तांबुल : तुर्कियेची राजधानी इस्तांबुलमधून एक अत्यंत थक्क करणारी आणि डोळे पांढरे करणारी घटना समोर आली आहे. समुद्र किनारपट्टीवर प्री-वेडिंग फोटोशूट सुरू असताना अचानक आलेल्या जोरदार वाऱ्याच्या झोक्यामुळे हातातील मोठे हीलियम गॅसचे फुगे धरलेली नवरी थेट हवेत उडाली. या थरारक घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. इस्तांबुलमधील निसर्गाचे सौंदर्य लाभलेल्‍या बास्फोरस बीचवर ही घटना घडली.

समुद्रकिनाऱ्यावर लग्नाच्या सुंदर आठवणी कॅमेऱ्यात टिपण्यासाठी नव्‍या नवरीने हातात अनेक रंगीबेरंगी मोठे हेलियमचे फुगे पकडले होते. फोटोशूट अगदी मजेत सुरू असतानाच समुद्राकडून अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे नवरीच्या हातातील हेलियमचे मोठे फुगे तिला हवेत खेचू लागले. काही क्षणांतच तिचे पाय जमिनीवरून उचलले गेले आणि ती फुग्यांसह हवेत तरंगू लागली. हा अनपेक्षित प्रकार पाहून छायाचित्रकार आणि उपस्थितांची धावपळ उडाली.

याचवेळी जवळ असलेल्या एका व्यक्तीने धावत जाऊन नवरीचा हात घट्ट पकडला. त्यामुळे ती आणखी वर जाण्यापासून वाचली. या घटनेनंतर फोटोशूट थांबवण्यात आले. या घटनेचा व्हिडीओ एक्सवर एका हँडलवरून शेअर करण्यात आला असून नेटिझन्स त्यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत. 'शौक आणि स्टाईल महत्त्वाची आहे; पण सुरक्षा नेहमीच पाहता आली पाहिजे,' अशी प्रतिक्रिया एका यूजरने दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT