विश्वसंचार

जुन्या घराच्या बाथटबखाली सापडला चक्क बॉम्ब!

Arun Patil

वॉशिंग्टन : युरोपमध्ये अजूनही दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील बॉम्ब व अन्य शस्त्रे सापडत असतात. केवळ युरोपच नव्हे, तर जगातील अन्य देशांमध्येही जुन्या काळाशी संबंधित ठिकाणी अशा काही वस्तू सापडत असतात. आता अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये एका जुन्या घराचे नूतनीकरण केले जात असताना बाथरूममधील बाथटब सरकवला, त्यावेळी मजुरांना एक बॉक्स आढळला. या बॉक्समध्ये चक्क बॉम्ब होता!

हा बॉक्स उघडल्यावर कॉन्ट्रॅक्टर आणि सगळे मजूर तिथून पळून गेले. बॉक्समध्ये एक ग्रेनेड म्हणजेच हातबॉम्ब होता. पोलर बीअर कंस्ट्रक्शनचा मालक वादिम खारखवी याने याबाबतची माहिती दिली. त्याने सियाटेलच्या बॅलार्डमध्ये घराच्या तिसर्‍या मजल्यावर असलेल्या बाथरूममधील बाथटबखाली लपवलेला हा हातबॉम्ब पाहिला. हा माणूसही आधी तेथून पळून गेला होता; पण नंतर त्याने परत येऊन त्याचा व्हिडीओ बनवला व तो सोशल मीडियात शेअर केला. त्याने सांगितले, मी तिथून घाबरून पळून गेलो. बाहेर जाऊन श्वास घेतला आणि परत आत गेलो. त्याचा व्हिडीओ बनवला. मी फोन झूम करून हा बॉम्ब जवळून पाहिला आणि नंतर पोलिसांना माहिती दिली. सुदैवाने हा बॉम्ब निकामी होता!

SCROLL FOR NEXT