नवी दिल्ली : अंडं हा प्रोटिनचा एक उत्तम स्रोत आहे आणि विशेषतः नाश्त्यासाठी खूप लोकप्रिय असतो. उकडलेलं अंडं ऑम्लेटच्या तुलनेत कमी कॅलरीचे असतं. कारण, ते तेल वगळून शिजवलं जातं. ऑम्लेट चवदार असते; पण त्यात तेल घातल्यामुळे कॅलरी वाढू शकतात. जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर उकडलेलं अंडं हा चांगला पर्याय असू शकतो. दुसरीकडे, भाज्या भरलेले ऑम्लेट अधिक पौष्टिक असू शकतो.
उकडलेलं अंडं हे आरोग्यदायी स्वरूपांपैकी एक मानलं जातं. याला तेल किंवा तूप न घालता शिजवलं जातं, ज्यामुळे त्यात कॅलरींचं प्रमाण कमी असतं. एका उकडलेल्या अंडात साधारणपणे 70 कॅलरीज असतात आणि ते प्रोटिन, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने भरलेलं असतं. वजन कमी करायचं असेल किंवा हलकं जेवण हवं असेल, तर उकडलेलं अंडं एक उत्तम पर्याय असू शकतं. हे घेऊन जाणं आणि रस्त्यात खाणंही खूप सोपं आहे. ऑम्लेट अनेकांना खूप आवडतं आणि हे चवदार असतानाच, पोट भरणार देखील असतं. मात्र, ऑम्लेट शिजवताना साधारणपणे तेल किंवा तूप वापरले जाते, ज्यामुळे त्यातील कॅलरीज वाढतात. साधं अंड्याचं ऑम्लेट आरोग्यदायी असू शकतं; पण त्यात पनीर, बटाटे किंवा जास्त तेल घालल्यास ते जड होऊ शकतं. तुम्ही त्यात पालक, टोमॅटो, कांदा किंवा सिमला मिरचीसारख्या भाज्या घालून ते अधिक पौष्टिक बनवू शकता, ज्यामुळे ते फायबर्स आणि व्हिटॅमिन्सने भरपूर होईल. दोन्ही प्रकारात प्रोटिनचे प्रमाण साधारणपणे समान असते. तसेच दोन्ही अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी आणि लोह असते. जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत असाल, तर उकडलेलं अंडं सहसा अधिक चांगला पर्याय आहे. कारण, त्यात कॅलरी आणि फॅट कमी असतात. परंतु, जर तुम्हाला असा नाश्ता हवा असेल जो तुम्हाला जास्त वेळ पोट भरून ठेवेल, तर कमी तेलात तयार केलेलं भाज्यांचं ऑम्लेट एक चांगला पर्याय असू शकतो. उकडलेलं अंडं हलकं आणि कॅलरी कमी असे असते, तर ऑम्लेट पौष्टिक बनवण्यासाठी भाज्या घालून अधिक फायदेशीर होऊ शकते.