Black garlic: काळा लसूण हृदय, यकृतासाठी गुणकारी Pudhari
विश्वसंचार

Black garlic: काळा लसूण हृदय, यकृतासाठी गुणकारी

सामान्य लसूणमध्ये ॲलिसिन नावाच्या पदार्थाचे प्रमाण जास्त असते. या पदार्थामुळे त्यात उग्र वास आणि जीवाणूविरोधी गुणधर्म असतात

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : काळा लसूण हा लसणाचा नवीन प्रकार नाही. आपण वापरत असलेला सामान्य लसूण काही आठवड्यांसाठी नियंत्रित तापमानात ठेवला जातो. या प्रक्रियेदरम्यान त्यात रासायनिक बदल होतात, ज्यामुळे लसूण काळा होतो. काळ्या लसणाचा तिखटपणा कमी होतो आणि चव हलकी, गोड होते. हा लसूण हृदय आणि यकृतासाठी गुणकारी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सामान्य लसूणमध्ये ॲलिसिन नावाच्या पदार्थाचे प्रमाण जास्त असते. या पदार्थामुळे त्यात उग्र वास आणि जीवाणूविरोधी गुणधर्म असतात. जरी काही लोकांना पाचक समस्या असू शकतात. परंतु, काळ्या लसूणमधील बहुतेक ॲलिसिन स्थिर अँटिऑक्सिडेंटस्‌‍मध्ये रूपांतरित होते. विशेषतः, एस-एलिल सिस्टीन नावाचा पदार्थ शरीराद्वारे सहज शोषला जातो. म्हणूनच अँटिऑक्सिडेंट फायद्यांसाठी काळा लसूण हा एक चांगला पर्याय मानला जातो. काळ्या लसूणमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात साहाय्यक आहे. हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे. लसूण यकृताच्या आरोग्यासाठीही उपयुक्त आहे. यात असे गुणधर्मदेखील आहेत, जे प्रदूषणाचे परिणाम काही प्रमाणात कमी करण्यास मदत करतात.

दररोज एक किंवा दोन कळ्या खाल्ल्याने चांगले परिणाम मिळतात. ते थेट चघळले जाऊ शकतात किंवा स्वयंपाकात वापरले जाऊ शकतात. लसणाचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर आहे. सात दिवस रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते, हृदय निरोगी राहते, रक्तातील साखर नियंत्रित होते, पचनक्रिया सुधारते. हे शरीराला डिटॉक्सिफाई करण्यास मदत करते. लसूण हा केवळ जेवणाची चव वाढवणारा पदार्थ नसून तो एक शक्तिशाली औषधी घटक आहे. आयुर्वेदात लसणाला ‌‘हृदय आणि पचनसंस्थेचा मित्र‌’ मानले जाते. लसणामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. नियमित लसूण खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. हे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच, लसणामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याचे प्रमाण कमी होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT