विश्वसंचार

निळ्या देवमाशाचे भले मोठे हृदय!

Arun Patil

नवी दिल्ली : पृथ्वीच्या पाठीवरील सर्वात मोठ्या आकाराचा प्राणी म्हणजे ब्ल्यू व्हेल किंवा निळा देवमासा. हा केवळ समुद्रातीलच नव्हे तर समुद्र व जमीन अशा दोन्ही ठिकाणी असलेल्या प्राण्यांमध्ये सर्वात मोठ्या आकाराचा जीव आहे. हा मासा किती महाकाय असतो याची कल्पना तुम्हाला सोबतच्या छायाचित्रावरून येऊ शकेल. हे निळ्या देवमाशाचे हृदय आहे! हा मासा अक्षरशः 'मोठ्या हृदयाचा' आहे!

उद्योगपती हर्ष गोएंका सोशल मीडियावर अनेकदा आश्चर्यकारक फोटो आणि व्हिडीओ शेअर करतात. नुकताच त्यांनी हा फोटो पोस्ट केला आहे, ज्यामध्ये ब्लू व्हेलचे जतन केलेले हृदय दिसत आहे. ब्लू व्हेल माशाच्या हृदयाचा आकार प्रचंड मोठा असल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. हर्ष गोएंका यांनी हा फोटो शेअर करत म्हटले आहे की, हे ब्लू व्हेलचे जतन केलेले हृदय आहे. त्याचे वजन 181 किलो असून ते 4.9 फूट लांब तर 3.9 फूट रुंद आहे. त्याच्या हृदयाचे ठोके 3.2 किलोमीटर अंतरावरून ऐकू येतात. टोरोंटो येथील रॉयल ओंटारियो संग्रहालयात हे ब्लू व्हेल माशाचे हृदय जतन करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT