Pompeii 2000 year old warning | कुत्र्यापासून सावध राहा!  
विश्वसंचार

Pompeii 2000 year old warning | कुत्र्यापासून सावध राहा!

2000 वर्षांपूर्वीच्या पॉम्पेईमधील घराबाहेरचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : आज आपण आपल्या घराबाहेर ‘बी वेअर ऑफ डॉग’ किंवा ‘कुत्र्यापासून सावध राहा’ असे फलक पाहतो. मात्र, हा इशारा देण्याची पद्धत काही आजची नाही, तर ती हजारो वर्षे जुनी आहे. याचे सर्वात जिवंत पुरावे ज्वालामुखीच्या राखेखाली गाडल्या गेलेल्या पॉम्पेई शहरात सापडले आहेत.

जगातील पहिले सुरक्षा फलक

1824 मध्ये संशोधकांनी पॉम्पेईमधील एका घराचे उत्खनन केले असता, प्रवेशद्वाराच्या जमिनीवर एक सुंदर मोझॅक (दगडी नक्षीकाम) सापडले. यात साखळदंडाने बांधलेला, टोकदार गळपट्टा घातलेला एक काळा रागीट कुत्रा दाखवण्यात आला होता. या कुत्र्याच्या पायांच्या मध्ये लॅटिन भाषेत ‘केव कॅनेम’ असे लिहिले होते, ज्याचा अर्थ होतो ‘कुत्र्यापासून सावध राहा.’

प्राचीन रोमन संस्कृतीत कुत्र्यांना खूप मानाचे स्थान होते. कवी व्हर्जिलच्या मते, ज्या घरात कुत्रा रक्षक आहे, तिथे चोर किंवा लांडग्यांची भीती बाळगण्याची गरज नव्हती. रोमन लोक शिकारीसाठी ब्रिटन आणि ग्रीसवरून विविध प्रजातींचे कुत्रे आयात करत असत.

पॉम्पेईची शोकांतिका

जेव्हा माऊंट विसुवियस ज्वालामुखीचा उद्रेक झाला, तेव्हा अनेक निष्ठावान कुत्रे आपल्या मालकांसोबतच गाडले गेले. उत्खननादरम्यान एका घराच्या गळ्यात साखळदंड असलेला कुत्रा तसाच मृत अवस्थेत आढळला, जो शेवटपर्यंत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT