Mushroom health benefits | आहारात मशरूमचा समावेश लाभदायक 
विश्वसंचार

Mushroom health benefits | आहारात मशरूमचा समावेश लाभदायक

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली: बदलत्या ऋतुमानानुसार आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आजकाल लोक चवीसोबतच आरोग्याला पोषक ठरेल अशा आहाराला पसंती देत आहेत. यामध्ये ‘मशरूम’ (आळिंबी) हे सध्या एक उत्तम पर्याय म्हणून समोर आले आहे. मशरूम केवळ चविष्टच नाही, तर शरीरासाठी अत्यंत फायदेशीर आणि पोषक तत्त्वांचा खजिना मानले जाते. दैनंदिन आहारात मशरूमचा समावेश केल्याने शरीरात अनेक सकारात्मक बदल होतात, असे आहारतज्ज्ञ सांगतात.

जर तुम्हाला वारंवार होणारे व्हायरल इन्फेक्शन आणि आजारांपासून वाचायचे असेल, तर मशरूम हा सर्वोत्तम पर्याय आहे. हे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. यात असलेले अँटिऑक्सिडंटस् शरीराला तणावापासून वाचवतात आणि पेशींचे नुकसान होण्यापासून रोखतात. विशेष म्हणजे, मशरूमच्या सेवनाने महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा धोकाही कमी होऊ शकतो. मशरूम मेंदूसाठी अत्यंत गुणकारी मानले जाते. यातील पोषक तत्त्वे विसरभोळेपणा किंवा विचार करण्याच्या क्षमतेशी संबंधित समस्या (Mild Cognitive Impairment) दूर ठेवण्यास मदत करतात.

तसेच, यात मुबलक प्रमाणात असलेले पॉलिफेनॉल आणि अँटिऑक्सिडंटस् अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण देतात. हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी मशरूम फायदेशीर आहे. यातील घटक रक्तवाहिन्यांमध्ये ‘प्लाक’ जमा होण्यापासून रोखतात. मशरूममुळे कॅलरी, फॅट आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, ज्यामुळे पर्यायाने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. मशरूम आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप चांगले असते. हे शरीरातील ‘मायक्रोबायोम’ म्हणजेच बॅक्टेरिया आणि व्हायरसवर नियंत्रण ठेवते आणि शरीरातील चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवण्यास मदत करते. यामुळे पचनसंस्था सुधारते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT